आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Yusuf Pathan Ties Knot With Mumbai Physio Afreen

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS : आफरीनसोबत झाला युसूफचा निकाह; आता इरफानचा नंबर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- क्रिकेटर युसूफ पठाण याने बुधवारी आपली मैत्रिण आफरीनसोबत निकाह केला. तीस वर्षाच्या युसूफने गेल्या वर्षी नादियाड येथे एका खासगी समारंभात साखरपुडा केला होता. आफरीन एक फिजियोथेरेपिस्ट आहे. मुंबईत राहणारी आफरीन आता पठाणची बेगम बनली आहे. आफरीन बडोद्यात फिजियोथेरपिस्ट काम पाहत आहे.

गेल्या काही काळात टीम इंडियातून बाहेर गेलेल्या युसूफने आतापर्यंत 57 वनडेत 1365 धावा केल्या आहेत. तसेच 22 टी-20 सामन्यात 438 धावा बनविल्या आहेत. आता मोठा भाऊ युसूफचे लग्न झाल्याने त्याचा छोटा भाऊ इरफानच्या लग्नाचा मार्ग मोकळा झाला आहे. इरफानने आपल्या भावाच्या लग्नाला गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींना आमंत्रित केले होते.

27 मार्चला झालेल्या 'दावते वलीमा'वेळी युसूफने जोधपुरी बूट घातले होते. त्यासाठी त्याने जोधपूरमधील रमेश पप्पू चौहान या व्यावसायिकाला चप्पल व बूटाचे तीन जोड बनविण्यास सांगितले होते. त्यातील दोन जोड युसूफसाठी तर एक आफरीनसाठी मागविला होता. या जोडावर जरीचे काम करण्यात आले होते. याच पप्पूने अभिषेक बच्‍चन, वीरेंद्र सहवाग, गौतम गंभीर, पार्थिव पटेल यांच्या लग्नासाठी चप्पल व बूट मागिवले होते. याचबरोबर अमिताभ बच्‍चन व सचिन तेंडुलकरलाही पप्पूने बनवलेल्या जोधपुरी जोड खूप पसंत आहेत.