आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'सर्व मंत्रिमंडळ, आमदार, खासदार प्रचारात, मग देश चालवतो कोण?\', आदित्‍य ठाकरेंचा भाजपला टोला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- 'केंद्रीय मंत्रीमंडळ, सर्व मुख्यमंत्री, शेकडो आमदार, खासदार, कित्येक राज्यांचे पदाधिकारी, सर्वांनीच स्वतःला प्रचारात झोकून घेतले आहे. पण प्रश्न एवढाच आहे की, देश चालवतोय तरी कोण?', अशा शब्‍दात शिवसेनेच्‍या युवा सेनेचे प्रमुख आदित्‍य ठाकरे यांनी भाजपला चिमटा काढला आहे. गुजरात विधानसभा निवडणूक ही भाजपसाठी सर्वात प्रतिष्‍ठेची निवडणूक समजली जाते. यासाठी भाजपने अख्‍खे मं‍त्रिमंडळ प्रचारासाठी गुजरातमध्‍ये उतरवले आहे. याचा आपल्‍या ट्विटरवरुन आदित्‍य ठाकरे यांनी खोचक शब्‍दात  समाचार घेतला.

 

'नेशन फर्स्‍ट' नाही, यांचा खरा नारा 'इलेक्‍शन फर्स्‍ट'
- ज्‍या गुजरातसाठी भाजप एवढा जोर लावत आहे. ते अस राज्‍य आहे ज्‍याच मॉडेल दाखवून भाजपने देश जिंकला. मग या राज्‍याची निवडणुक जिंकण्‍यासाठी भाजपला एवढा जोर का लावावा लागत आहे, असा अप्रत्‍यक्ष टोला त्‍यांनी भाजपला लगावला. ते म्‍हणाले, 'बरं हे असे राज्य ज्याचे मॉडेल दाखवून देश जिंकले! मुळात हे विकासाचे मॉडेल नाहीच. ते फक्‍त जाहीरात करण्‍यासाठीच एक राजकीय मॉडेल आहे.  नेशन फर्स्‍ट राहिले नाही, यांचा खरा नारा आहे इलेक्‍शन फर्स्‍ट.'


संसेदचा मान राखला नाही
- केंद्र व राज्‍यांच्‍या निवडणुका एकत्र घेण्‍यास भाजप अनुकूल आहे. मात्र केवळ गुजरात निवडणुकीसाठी भाजपने जी ताकद राज्‍यात लावली, त्‍यावर टोला लगावताना आदित्‍य म्‍हणाले,'वन नेशन, वन इलेक्‍शन या धोरणाअंतर्गत हे केंद्र आणि इतर राज्‍यांच्‍या वेगळ्या निवडणुका घेतील आणि गुजरातच्‍या वेगळ्या. यांनी तर संसदेचाही मान राखला नाही.'    


पुढील स्‍लाइडवर पाहा, आदित्‍य ठाकरे यांचे ट्विट्स...

बातम्या आणखी आहेत...