आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छत्रपतींचे वंशज पुरातत्व खात्याचे Brand Ambassador, फोटोमधून पाहा रुबाब..

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आता राजे महाराष्ट्राच्या पुरातत्व विभाग आणि किल्ल्याच्या संवर्धनासाठी महत्त्वाची भूमिका निभावतील. - Divya Marathi
आता राजे महाराष्ट्राच्या पुरातत्व विभाग आणि किल्ल्याच्या संवर्धनासाठी महत्त्वाची भूमिका निभावतील.
मुंबई - छत्रपती शिवाजी आणि राजर्षी शाहू महाराजांचे 13 वे वंशद आणि राज्यसभा सदस्य संभाजी महाराज महाराष्ट्र टुरिझम च्या पुरातत्व विभागाचे ब्रँड अॅम्बेसेडर असणार आहेत. सोमवारी मंत्रालयात पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी संभाजी महाराजांच्या उपस्थितीत याची घोषणा केली. संभाजी महाराजांची प्रसिद्धी आणि मराठा चेहरा समोर आणण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे.
गड संवर्धनाचे उद्दिष्ट..
- आता राजे महाराष्ट्राच्या पुरातत्व विभाग आणि किल्ल्याच्या संवर्धनासाठी महत्त्वाची भूमिका निभावतील.
- संभाजी महाराजांच्या माध्यमातून भारतातीलच नव्हे तर जगभरातील पर्यटकांना आकर्षित करता येऊ शकेल.
- ब्रँड अॅम्बेसेडर बनवल्यानंतर महाराज म्हणाले, ब्रँढ अॅम्बेसेडर चित्रपट अभिनेते असतात. ते सुंदर असतात.
- तरीही मला पर्यटन विभागाच्या पुरातत्व विभागाची जबाबदारी मिळत असेल तर तिचा स्वीकार करत असल्याचे ते म्हणाले.
- दुसऱ्या कोणत्याही विभागातून ब्रँड अॅम्बेसेडर बनवण्याचा प्रस्ताव आला असता तर तो मान्य केला नसता असेही संभाजीराजे म्हणाले.

एमबीपर्यंत शिक्षण..
- संभाजी राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या 13 व्या पिढीचे आहेत.
- त्यांनी कोल्हापूरमधून एमबीए केले आहे.
- गेल्या अनेक वर्षांपासून संभाजी महाराज सामाजिक कार्यातही सहभागी होतात.
- महाराष्ट्रात संभाजी महाराज प्रसिद्ध आहेत. त्यांचे चाहते त्यांना महाराज म्हणूनच बोलावतात.

पुढील स्लाइड्सवर पाहा, संभाजी महाराजांचे निवडक PHOTOS..
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...