आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युवराज सिंग मुंबईत घेतोय 60 कोटींचा अलिशान बंगला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- एकीकडे क्रि‍केटमधील स्‍पॉट फि‍क्‍सिंगमुळे साक्षीपासून शि‍ल्‍पा शेट्टीपर्यंत सर्व जण परेशान आहेत तर, दुसरीकडे भरताचा मधल्या फळीतील युवराज सिंग मुंबईतील वरळी भागात 60 कोटीचे घर खरेदी करीत आहे.

युवराज सिंग वरळीत 16 हजार स्क्वेअर फूटचे घर खरेदी करणार आहेत. वरळी हे मुंबईचे ह्दय मानले जाते. तसेच हा सर्वात महागडा परिसर आहे. रि‍यल इस्‍टेटमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, युवराज सिंग ही मालमत्ता राहण्यासाठी घेत नसून, व्यावसायिक फायद्यासाठी खरेदी करीत आहे. ज्या टॉवरमधील संपूर्ण एक फ्लोर युवराज खरेदी करणार आहे तो ओमकार रि‍यलेटर्स यांनी बनवला आहे.

वरळीतील गोपाळनगरमध्ये जुन्या पासपोर्ट ऑफि‍सजवळ तीन इमारती बांधल्या आहेत. वरळीतील रि‍यल इस्‍टेटमध्ये काम करणा-या एका एजेंटाच्या माहितीनुसार, येथे झोपडपट्टीत राहणा-या लोकांच्या पुनर्वसनासाठी इमारत बांधली आहे. मात्र जर कोणी व्यक्ती महाग घरे खरेदी करु इच्छित असेल तर त्याला ओमकार रि‍यलेटर्सद्वारे बनविली गेलीली इमारत दाखवली जाते.

पुढे पाहा, युवराज, सचिन आणि धोनीचा अनोखी व प्यारा बंगला.... क्लिक करा..