आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हा आहे 26/11 चा मास्टरमाईंट: कसाब म्हणाला होता, झकी चाचानेच हल्ल्यासाठी भडकवले!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई हल्ल्याच्या वेळीही लख्वी सॅटेलाइट फोनवरून सर्व दहा अतिरेक्यांच्या संपर्कात होता. - Divya Marathi
मुंबई हल्ल्याच्या वेळीही लख्वी सॅटेलाइट फोनवरून सर्व दहा अतिरेक्यांच्या संपर्कात होता.

मुंबई- मुंबईवर झालेल्या 26/11च्या हल्ल्यात एकमेव जिवंत पकडलेल्या व नंतर फाशी देण्यात आलेल्या दहशतवादी अजमल कसाबने चौकशीदरम्यान झकी-उर-रहमान लख्वीचा स्पष्ट उल्लेख केला होता. पोलिसांना त्याने लख्वीबद्दल सविस्तर माहिती दिली होती. ‘झकी चाचा म्हणायचा, हे अल्लाचे काम आहे. तुझे नाव होईल, कुटुंबातही प्रतिष्ठा मिळेल, प्रचंड पैसा कमावशील...तुम्हाला पुरस्कारही मिळेल,’ असे कसाबने जबाबात नमूद केले होते. नंतर अबू जिंदाल आणि डेव्हिड हेडलीच्या चौकशीतूनही लख्वीचे नाव अनेकदा आले होते.

 

मुंबई हल्ल्याच्या वेळीही लख्वी सॅटेलाइट फोनवरून सर्व दहा अतिरेक्यांच्या संपर्कात होता. कुणीही मोबाईल कट करू नका, तुम्ही काय करता आहात ते लाईव्ह कळायला हवे, असे तो प्रत्येक अतिरेक्याला सांगत होता. एवढेच नव्हे, ताज हॉटेलसह इतरत्र ओलीस ठेवलेल्या लोकांना खाली बसवून पाठीत गोळ्या घालण्याची सूचनाही त्याने फोनवर अतिरेक्यांना केली होती. जास्तीत जास्त लोकांना मारत राहा, असेही तो वारंवार सांगत होता. ही माहिती नंतर टॅप केलेल्या संभाषणातून उघडकीस आली होती.

 

1999 मध्ये पहिल्यांदा गरळ ओकली...

 

लख्वी 1999 मध्ये सर्वप्रथम प्रकाशझोतात आला. पाकिस्तानात कट्टरवाद्यांनी आयोजित केलेल्या एका तीनदिवसीय संमेलनात त्याने भारताविरुद्ध इतकी गरळ ओकली की स्थानिक माध्यमांमध्ये तो एकदम चमकला. भारताला अद्दल घडवण्याची वेळ आली असल्याचे त्याचे तेव्हाचे फुत्कार नंतर 26/ 11 च्या मुंबई हल्ल्यापर्यंत सुरू होते. 

 

झकी-उर-रहमान लख्वी आहे कोण?

 

- लष्कर-ए-तोयबा या अतिरेकी संघटनेचा कमांडर.
- मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या (26/11) हल्ल्याचा मास्टरमाइंड.
- या हल्ल्याची पूर्ण योजना लख्वीने तयार केली होती.
- मुंबई धुमाकूळ घालणा-या कसाबसह सर्व अतिरेक्यांना लख्वी सॅटेलाइट फोनवरून निर्देश देत होता.
- या हल्ल्यासाठी कराचीमध्ये नियंत्रण कक्षात बसून दिल्या जात होत्या अतिरेक्यांना सूचना.
-7 डिसेंबर 2008 रोजी पाकव्याप्त काश्मीरमध्ये मुजफ्फराबादमध्ये अटक.
- लख्वीला भारताच्या स्वाधीन करण्याची मागणी पाकने फेटाळली होती.
- यानंतर पाकने मुंबई हल्ल्याचा खटला पाकिस्तानातच चालवण्याचा निर्णय घेतला.
- 27 नोव्हेंबर 2009 रोजी लख्वीसह सात जणांवर आरोप निश्चित करण्यात आले. 
- नंतर लख्वीला रावळपिंडी तुरुंगात कैद करण्यात आले पण 2015 मध्ये तो पुन्हा तुरूंगातून बाहेर सुटला.

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, झकी-उर-रहमान लख्वीचे फोटोज...

बातम्या आणखी आहेत...