आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झेडपीत काँग्रेसची सरशी, राष्ट्रवादीचा धुव्वा, भाजप-सेना बॅकफूटवरच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राज्यात तीन जिल्ह्यात झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेसची सरशी झाली असून, तीनपैकी दोन झेडपीत त्यांनी स्पष्ट बहुमत मिळवत वर्चस्व राखले आहे. काँग्रेसने नंदूरबार जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता संपुष्टात आणत त्यांना जबर धक्का दिला असून, राष्ट्रवादीला चांगलाच सुरुंग लावला आहे.
काँग्रेसने धुळेमध्ये आपली सत्ता कायम ठेवण्यात यश मिळवले. तर, अकोला जिल्हा परिषदेत 52 पैकी जागांपैकी 22 जागा जिंकून भारिप बहुजन महासंघाच्या प्रकाश आंबेडकर यांनी आपला गड शाबूत ठेवला आहे. अपक्षांना सोबत घेऊन सत्ता मिळविण्याचा प्रयत्न करणा-या भारिपला काँग्रेसने पाठिंबा देण्याची तयारी दर्शिवली आहे. अकोल्यात काँग्रेसने 5 जागा जिंकल्या आहेत. एकून तीनही जिल्हा परिषदेचे निकाल पाहता काँग्रेसची सरशी झाली आहे तर राष्ट्रवादीचा धुव्वा उडाला आहे. भाजप-शिवसेना- आरपीआयचा या निवडणुकांत कोठेही प्रभाव दिसला नाही. नंदुरबार जिल्ह्यात युतीला 55 जागांपैकी केवळ एकच जागा जिंकण्यात यश आले आहे. यावरून महायुतीचा प्रभाव किती कुमकुवत व मर्यादित आहे हे दिसून येत आहे. त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचा विश्वास वाढवणारी ही निवडणुक ठरणार आहे.
धर्मांध शक्तींशी हातमिळवणी केल्याने राष्ट्रवादीचा धुव्वा, वाचा पुढे...