आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

झिशान खानच्या मित्रांचाही नाेकरी नाकारण्याचा निर्धार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - एमबीए झालेल्या झिशान खानला धर्माच्या आधारावर नोकरी नाकारणार्‍या हरेकृष्णा डायमंड कंपनीची नोकरी न स्वीकारण्याचा निर्धार झिशान अली खानच्या मित्रांनी केला आहे. मुकुंदमणी पांडे आणि ओमकार बनसोडे अशी त्यांची नावे आहेत. झिशान, मुकुंदमणी आणि ओमकार यांनी इंटरनॅशनल बिझनेसमध्ये स्पेशलायझेशन केले आहे. हरेकृष्णा या हिरे कंपनीत झिशानने नोकरीसाठी अर्ज केला. मात्र, त्याला धर्माच्या आधारावर नोकरी नाकारण्यात येत असल्याचे कंपनीचे पत्र आले. त्यानंतर देशभरात एकच चर्चा रंगली आहे. या कंपनीत तिघांनी एकत्रच अर्ज केले होते. मात्र, झिशानला नोकरी नाकारण्यात आल्याचे पत्र पाठवण्यात आले. त्यानंतर त्याने कंपनीविरोधात पोलिसांत तक्रार दिली.

चुकीची भूमिका
कंपनीने धर्माच्या केवळ आधारावर नोकरी नाकारणे चुकीचे आहे. आपला देश लोकशाही मानणारा आहे. त्यामुळे मला या कंपनीने नोकरीसाठी विचारणा केल्यास मी ती नाकारीन. - मुकुंदमणी पांडे.

नकार कळवला
आज सकाळीच हरेकृष्णा कंपनीचा मुलाखतीस येण्यासाठी फोन आला होता. मात्र, मी त्यांना धर्माच्या आधारावर नोकरी नाकारणार्‍या कंपनीत आपल्याला नोकरी करायची नसल्याचे सांगितले आहे. - आेमकार बनसोडे