आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुटी असली तरी शनिवारी उमेदवारी अर्ज स्वीकारणार; निवडणूक आयोगाच्या सूचना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- काही जिल्ह्यांमध्ये २९ ऑक्टोबर रोजी दिवाळीनिमित्त स्थानिक सुटी असली तरीही त्या दिवशी नगर परिषद, नगर पंचायत व थेट नगराध्यक्ष निवडणुकांसाठीचे उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात यावेत, अशा सूचना राज्य निवडणूक आयोगातर्फे संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

राज्य निवडणूक आयोगाने २१२ नगर परिषद, नगर पंचायतीच्या व थेट नगराध्यक्षपदासाठी चार टप्प्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. पहिल्या टप्प्यात २५ जिल्ह्यांतील १४७ नगर परिषदा व १८ नगर पंचायतींच्या तसेच १४७ नगर परिषदांमधील थेट अध्यक्षपदाच्या निवडणुकांसाठी २७ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत २९ ऑक्टोबर ही अंतिम मुदत आहे. या दिवशी काही जिल्ह्यांमध्ये दिवाळीनिमित्त स्थानिक सुटी जाहीर करण्यात आली आहे. मात्र निवडणूक नियमानुसार स्थानिक सुटी ही सार्वजनिक सुटी म्हणून गृहीत धरली जात नाही. त्यामुळे २९ अाॅक्टाेबर राेजी स्थानिक सुटी असली तरीही या दिवशी उमेदवारी अर्ज स्वीकारले जातील, असे निवडणूक आयोगाच्या पत्रकात नमूद केले आहे.
बातम्या आणखी आहेत...