आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FACEBOOK चा भारतीयांना गंडा, आता म्‍हणतात इंजिनिअरची चूक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या डिजिटल इंडियाला पाठिंबा म्‍हणून फेसबुकने भारतातील यूजर्सचे प्रोफाइल फोटो तीन रंगात बदलवण्‍यासाठी लिंक दिली. त्‍या माध्‍यमातून सोमवारपासून लाखो यूजर्संनी आपले प्रोफाइल तिरंग्‍यात बदलले. एवढेच नाही तर सर्वप्रथम फेसबुकचा संचालक मार्क झुकरबर्ग याने आपले प्रोफाइल पिक्‍चर बदलले. मात्र, यातून फेसबुकने अत्‍यंत घाणेरडे राजकारण खेळले असून, प्रोफाइल पिक्‍चर तिरंग्‍यात परावर्तीत करताना यूजर्सच्‍या नकळत नेट न्यूट्रिलिटी च्‍या विरोधात मतदान घेतले. मात्र, ही बाब काही चाणाक्ष यूजर्सच्‍या लक्षात आल्‍यानंतर फेसबुकने याचे स्‍पष्‍ट‍िकरण दिले असून, आपल्‍या इंजिनिअरच्‍या चुकीमुळे हा प्रकार घडल्‍याचे सांगितले आहे.
सहा महिन्‍यापूर्वी झाला होता प्रयत्‍न
देशात नेट न्युट्रिलीटी नसावी यासाठी केंद्र सरकार आणि मोबाईल कंपन्‍यांकडून प्रयत्‍न झाला होता. मात्र, त्‍याला नागरिकांनी सोशल मीडियातून कडाडून विरोध केला. शिवाय या विरोधात विरोधी पक्षही आग्रमक झाले. परिणामी, शासनाला आपला निर्णय लागू करता आला नाही. पण, फेसबुकने डिजिटल इंडियाला पाठिंबा देण्‍याचे नाटक करत भारतीय यूसर्जकडून नेटच्‍या न्युट्रिलीटीच्‍या विरोधात मत नोंदवून घेतले आहे.
फेसबुकने केला खुलासा
फेसबुकचा मालक मार्क झुकरबर्ग याने पंतप्रधान मोदींच्या डिजिटल इंडिया उपक्रमाला पाठिंबा देण्यासाठी स्वत:चा प्रोफाईल पिक्चर तिरंग्यात ओढून घेतला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींसह लाखो भारतीयांनीही fb.com/supportdigitalindia या लिंकवर जाऊन आपल्या प्रोफाईल पिक्चरला तिरंगा झाकून घेतला. पण, यातून फेसबुकने नेट न्युट्रिलीटीच्‍या विरोधात भारतीयांचे मत नोंदवून घेतले. पण, ही बाबत यूजर्सच्‍या लक्षात येताच फेसबुक टीकेची झोड उठली. त्‍यानंतर फेसबुकच्‍या प्रवक्‍त्‍यांनी तत्‍काळ 'हफपोस्ट इंडिया'शी बोलताना या बाबत खुलासा केला. त्‍यांनी स्‍पष्‍टीकरण दिले की, आमच्या इंजिनिअरने चुकून ‘इंटरनेट डॉट ओआरजी प्रोफाईल पिक्चर’ असे लिंकच्या कोडमध्ये म्हटले आहे. परंतु, डिजिटल इंडियाला पाठिंबा आणि इंटरनेट डॉट ओआरजी या दोन्ही पूर्णपणे वेगळ्या मोहिमा आहेत. आम्ही आजच हे कोड बदलणार आहोत, असे असे ते म्‍हणाले आहे.

पुढील स्‍लाइड्सवर वाचा
1. काय आहे नेट न्युट्रिलीटी ?
2.का आहे नेट न्युट्रिलीटीच्‍या विरोधात का आहे कपन्यांची नाराजी ?
3.झुकरबर्ग आहे internet.org विरोधात