आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Two Sisters From Kolhapur Death Sentence In A Case Of 9 Child Murder

13. नऊ लहान मुलांची हत्या करणा-या गावित बहिणींना फाशीच!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापुरातील 13 मुलांचे अपहरण करुन त्यातील नऊ जणांची हत्या करणा-या रेणुका शिंदे आणि सीमा गावित यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची रेणुका आणि सीमा या बहिणींचा दयेचे अर्ज फेटाळला आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या शिफारशीनंतर हे अर्ज फेटाळण्यात आले आहेत.
स्वतः आई असलेली एक स्त्री आणि तिच्या दोन मुली इतरांच्या बालकांना पळवून त्यांना क्रूरपणे ठार मारू शकतात, हे अंजनाबाई गावित आणि तिच्या दोन मुलींना अटक केल्यानंतर जगासमोर आले. कोल्हापूरमध्ये 29 ऑक्‍टोबर 1996 रोजी बालहत्याकांड उघडकीस आले आणि या हत्याकांडामुळे सारा महाराष्ट्र हादरला. सुरवातीला अंजनाबाई एकटीच मुलांना पळवीत असे. नंतर तिने दोन्ही मुलींना त्यात सामील करून घेतले. 1990 च्या सुमारास त्यांनी मुलांना पळविण्यास सुरवात केली. चोरी, पाकीटमारी करण्यासाठी एक ते तेरा वर्षांपर्यंतच्या बालकांना पळवून त्यांचा खून केल्याचे हे प्रकरण आहे.
दिव्यमराठी टेक- नॉलेज पॅकेज (13 वर यासाठी)
कारण- गरीब वस्त्यांमधील लहान मुलांचे अपहरण करून त्यांना चोरी, पाकिटमारी, सोनसाखळी हिसकावणे आदी गुन्हे करण्यास या दोन्ही बहिणी भाग पाडत होत्या. ही मुले मोठी झाल्यानंतर त्यांना या गोष्टी कळू लागल्यामुळे या दोघींनी त्यांचे खून केले. असे कालचक्र अनेक वर्षे सुरु होते. अखेर दोघी बहिणीचे बिंग फुटले आणि त्यांना आता फासावर जाण्याची वेळ आली आहे.
फॅक्ट फाईल-
- 1990 ते 1996 या काळात रेणुका, तिचा पती किरण शिंदे, बहिण सीमा आणि आई अंजनाबाई गावित यांनी 13 लहान मुलांचे अपहरण केले होते. त्यातील नऊ मुलांचा निर्घृण खून करण्यात आला होता.
- आई अंजनाबाईचा 1997 मध्ये मृत्यू झाला. किरण शिंदे हा या खटल्यात माफीचा साक्षीदार झाला होता. दयेचा अर्ज फेटाळल्यामुळे दोन्ही बहिणींच्या फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब झाले आहे.
- अंजनाबाईचा 17 डिसेंबर 1997 रोजी कारागृहात मृत्यू झाला, त्यामुळे रेणुका व सीमा यांच्यावर खटला चालविण्यात आला. तेरा बालकांचे अपहरण करून खून केल्याचा आरोप पोलिसांनी त्यांच्यावर ठेवला.
- 28 जून 2001 रोजी कोल्हापूरमधील सेशन कोर्टाने या दोघींना नऊ मुलांचा खून केल्याप्रकरणी फाशीची शिक्षा सुनावली. रेणुका व सीमाने याला हायकोर्टात आव्हान दिले.
- हायकोर्टाने 8 सप्टेंबर 2004 रोजी सेशन कोर्टाचा फाशीच्या शिक्षेचा निर्णय कायम ठेवला. या निर्णयाला या बहिणींनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते.
- सुप्रीम कोर्टानेही 31 ऑगस्ट 2006 रोजी त्यांची फाशीची शिक्षा कायम ठेवली.
- फाशीची शिक्षा माफ करावी यासाठी त्यांनी केलेला दयेचा अर्ज दाखल, जुलै 2014 मध्ये राष्ट्रपतींनी दयेचा अर्ज फेटाळल्याने त्यांच्या फाशीवर शिक्कामोर्तब झाले आहे.