आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टंचाई निवारणार्थ २०८ प्रस्ताव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नंदुरबार - जिल्ह्यातील तळोदा वगळता विविध गावातील पाणीटंचाई निवारणार्थ सादर करण्यात आलेल्या २०८ प्रस्तावांना जिल्हाधिकारी प्रदीप पी यांनी मंजुरी दिली आहे. नंदुरबार तालुक्यात सर्वाधिक २५ खासगी विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या असून, विहिरींतील गाळ काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.
नंदुरबार तालुक्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी २१ प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवण्यात आले होते. त्यापैकी १८ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार विहीर खोल करणे गाळ काढण्याची जवळपास १० कामे पूर्ण करण्यात आली असून, कामे प्रगतिपथावर आहेत. त्याचबरोबर २५ खासगी विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. विंधन विहिरींच्या ४२ प्रस्तावांपैकी ३९ प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. होळ तर्फे हवेली येथे तात्पुरती नळ पाणीपुरवठा योजना करण्यात येणार असून, त्यासाठी निविदा काढण्यात आली आहे. नंदुरबार तालुक्यात १० विंधन विहिरींना पाणी लागले नाही.

धडगावमध्ये कामे रखडली
अक्कलकुवातालुक्यात ९० विंधन विहिरींच्या कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. ही सर्व कामे प्रगतिपथावर आहेत. धडगाव तालुक्यातील ६३ गावात विंधन विहिरी करण्याचे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत; परंतु नियोजनाच्या अभावामुळे ही कामे रखडलेली आहेत.

तळोद्यात टंचाई नाही
तळोदातालुक्यात एकाही गावात पाण्याची टंचाई नसून, भूजलपातळीही समाधानकारक आहे. नंदुरबार तालुक्यातील दहा गावे धडगाव तालुक्यातील अनेक पाड्यात पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. शहादा तालुक्यातील भूजलस्तर खालावल्याने चिंता व्यक्त होत आहे.

शहाद्यात २९ विंधन विहिरी
शहादातालुक्यात २९ विंधन विहिरींचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात पाठविण्यात आला होता. त्यातील कामांना मंजुरी मिळाली असून, विंधन विहिरींचे कामे पूर्ण झाले अाहे तर कामे प्रगतिपथावर आहेत. नवापूर तालुक्यात २७ विंधन विहिरींना मंजुरी मिळाली. त्यातून २५ विंधन विहिरींंचे काम पूर्ण झाले आहे.