आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 7 Died In An Accident Between Truck And ST Bus In Gujrat

गुजरात : ट्रकच्या धडकेने बस उभी कापली, सात ठार, मृतांत तिघे धुळ्याचे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे / शिरपूर - धुळे जिल्ह्यातील शिरपूर अागाराच्या शिरपूर-बडाेदा बसला रविवारी रात्री दहा ते अकरा वाजेच्या दरम्यान गुजरातमधील अंकलेश्वर महामार्गावर असलेल्या नेत्रम फाट्याजवळ समाेरून येणाऱ्या ट्रकने जाेरदार धडक िदली. या अपघातात बसचा जवळपास अर्धा भाग कापला गेला हाेता. त्यात सात जण ठार झाले अाहेत. त्यात धुळे जिल्ह्यातील बसचालक विशाल विश्वासराव निकम, नानासाहेब सखाराम पाटील व बिजाज खान यांचा समावेश अाहे.

शिरपूर अागाराची बस (एमएच २० बीएल २६९४) रविवारी सायंकाळी ५ वाजता िशरपूर अागारातून बडाेद्याकडे निघाली. अक्कलकुवामार्गे बस गुजरातमध्ये जात असताना सीमेलगत असलेल्या डेडियापाडा व नेत्रम गावांदरम्यान रात्री दहा ते अकरा वाजेच्या दरम्यान समाेरून येणाऱ्या ट्रकने (जीजे ११ झेड ७७७१) या बसला जाेरदार धडक दिली. रात्रीची वेळ असल्याने अनेक प्रवासी झाेपेत असल्याने नेमके काय झाले हे समजण्यापूर्वीच चालकाकडील बाजू सहा सीटपर्यंत कापली गेली. तसेच दर्शनी भागही पूर्ण उद्ध्वस्त झाला. ट्रकमध्ये अवजड वस्तू असल्याने बस पूर्णपणे कापली गेली. त्यात चार जणांचा जागीच मृत्यू झाला. बसमध्ये अडकलेले मृतदेह काढण्यासाठी पत्रा कापावा लागला.

या अपघातात बसचालक विशाल निकम (३१) याचा जागीच मृत्यू झाला. ताे बाेराडी येथील रहिवासी अाहे. तीन वर्षांपूर्वीच विशाल महामंडळात चालक म्हणून भरती झाला हाेता. तर थाळनेर येथील नानासाहेब पाटील (७५) हेही ठार झाले अाहेत. अपघात इतका भीषण हाेता की काही मृतांचे हातपाय व इतर अवयव कापले जाऊन रस्त्यावर पडले हाेते.

त्यामुळे नेमकी मृतांची अाेळख पटवण्यात अडचण निर्माण झाली हाेती. कपिल प्रभाकर सूर्यवंशी (२९, रा. तळोदा, हल्ली मुक्काम अंकलेश्वर), जसूबेन जुदाभाई खिंदव (भरवाड, जि. सुरेंद्रनगर), किरीट इंद्रप्रभात भट (५२, बडोदा), गांदूभाई अमाभाई भरवाड (६०, मोरवी, गुजरात), नाना सखाराम पाटील (६५, थाळनेर, ता. शिरपूर), विशाल निकम तर ट्रकचा सहचालक बिजाज खान जुबेर खान पठाण (शिरपूर) हे सात जण ठार झाले अाहेत. जखमींवर बडोदा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती पाेलिसांनी दिली.


बसचालक निकम परिवाराला धक्का
बसचालक विशाल निकम तीन वर्षांपूर्वी नाेकरीला लागल्याने घरातील वातावरण चांगले हाेते. त्याच्या परिवारात अाई-वडील, दाेन भाऊ, पत्नी व नऊ महिन्यांची मुलगी अाहे. त्याचा अपघातात मृत्यू झाल्याची बातमी कळल्यानंतर घरातील सदस्यांकडून एकच अाक्राेश करण्यात अाला. विशालवर साेमवारी सायंकाळी शाेकाकुल वातावरणात बाेराडी येथे अंत्यसंस्कार करण्यात अाले.

अपघातापूर्वी बस हाॅटेलवर थांबली
अपघातापूर्वी सव्वादहा वाजेच्या सुमारास बस गुजरातमधील डेडियापाडा येथील हाॅटेलवर जेवणासाठी थांबवण्यात अाली हाेती. त्यानंतर काही क्षणांतच अपघात झाल्याने नेमके काय झाले हे समजण्यापूर्वीच काहींना अापला जीव गमवावा लागला. बसमध्ये नेमके शिरपूरचे किती जण हाेते, याबाबत माहिती नसली तरी अपघातात चालकासह एक प्रवासी ठार झाल्याची माहिती प्राप्त झाली अाहे. अन्य मृतांबाबत माहिती अद्यापपर्यंत उपलब्ध नाही.
- स्वाती पाटील, अागारप्रमुख, शिरपूर
पुढील स्लाइड्सवर पाहा, अपघातानंतरचे काही PHOTOS