आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेल पोलिस अन‌् बलात्कारातील आरोपीचा अर्धा तास अंतराने मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - जिल्हा कारागृहात कार्यरत असलेले तुरुंगरक्षक नंदू काकुळदे यांचा तर अन्य एका घटनेत नाशिक कारागृहातून उपचारासाठी आलेल्या सुभाष होनाळे या बंदिवानाचा हिरे वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यू झाला. मंगळवारी सकाळी अवघ्या अर्ध्या तासाच्या अंतराने या वेगवेगळ्या दोन घटना घडल्या. यापैकी वयोवृद्ध आराेपी सुभाष होनाळे हा बलात्काराच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनांची शहर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. 

 

धुळे जिल्हा कारागृहात कार्यरत असलेले नंदू सोनू काकुळदे (वय ४०) हे जवळच असलेल्या शासकीय वसाहत बिल्डिंग क्रमांक चार, खोली क्रमांक एक या ठिकाणी वास्तव्याला होते. सोमवारी रात्री चहा घेऊन काकुळदे झोपले; परंतु मंगळवारी सकाळी मात्र ते उठले नाही. त्यामुळे त्यांच्या अाई फुलाबाई काकुळदे यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने सकाळी नऊ वाजेच्या सुमारास त्यांना हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले; परंतु उपचार सुरू करण्यापूर्वी त्यांचा मृत्यू झाला होता. डॉ. आरती बारबदे यांनी वैद्यकीय तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. यानंतर अवघ्या अर्धा तासाने नाशिक कारागृहातून हिरे रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेला आरोपी सुभाष शंकर होनाळे ( वय ७९) रा. भूमी पार्क सोसायटी, जनकल्याण ई-३०४, तिसरा माळा, गाेरेगाव, मुंबई-९५ याचाही मृत्यू झाला. सकाळी साडेनऊ वाजता त्याला डॉ. हर्षल पाटील यांनी मृत घोषित केले. होनाळे हा नाशिक कारागृहात शिक्षा भाेगत होता. दि. २ मेपासून त्याची प्रकृती बिघडली होती. त्यामुळे नाशिक सामान्य रुग्णालयात त्याला दाखल केले होते; परंतु आजारपणामुळे त्याची प्रकृती अधिक खालावल्यामुळे काल सोमवारी सायंकाळी साडेसात वाजता त्याच्यावर हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू होते. यानंतर मंगळवारी त्याचा मृत्यू झाला. 


होनाळे याच्यावर बलात्काराचा आरोप होता. याबाबत मुंबई येथील गाेरेगाव पोलिस ठाण्यात भादंवि कलम ३७६ (२), ३४ नुसार गुन्हा ( २१३/२००१) दाखल झाला आहे. सन २०११मध्ये होनाळे याला न्यायालयाने दोषी ठरविले. यानंतर नाशिक कारागृहात त्याची रवानगी करण्यात आली. सुमारे दहा वर्षांच्या शिक्षेपैकी सुमारे आठ वर्षे त्याने कारागृहात व्यतीत केले होते. 


नेमके काय घडले... 
तुरुंगरक्षक काकुळदे हे दोन ते तीन दिवसांपूर्वी लग्नकार्यासाठी गेले होते. मालेगाव येथे आल्यावर त्यांची प्रकृती बिघडली. त्यामुळे त्यांच्या भावाने डॉक्टरांकडून त्यांच्यावर उपचार केले. नंदू काकुळदे यांनी आग्रह केल्यामुळे त्यांना पुन्हा धुळ्यातील निवासस्थानी आणण्यात आले होते. तर होनाळे याच्या मृत्यूनंतर नाशिक पोलिसांनी धुळे शहर पाेलिसांशी संपर्क साधला. यानंतर दुपारी चार वाजेच्या सुमारास इन कॅमेरा त्याचे शवविच्छेदन करण्यात आले. 


कुटुंबीयांचाही झाला मृत्यू 
तुरुंगरक्षक नंदू काकुळदे यांना असाध्य आजार जडला होता. आजारामुळे काही काळापूर्वी त्यांची पत्नी आणि मुलाचाही मृत्यू झाला होता. तर त्यांच्या वयोवृद्ध आई फुलाबाई सोनू काकुळदे (वय ७०) या नंदू काकुळदे यांचा सांभाळ, स्वयंपाक व औषधोपचार करत होत्या. काकुळदे हे मालेगाव येथील मूळ रहिवासी होते. 

बातम्या आणखी आहेत...