आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विद्यार्थी निवासासाठी दिले 1.5 कोटीचे घर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - आपल्या मागे राहणा-या संपत्तीवरून भावाभावांत भांडणे होण्यापेक्षा कष्टाने कमावलेली ही संपत्ती जनकल्याणासाठी उपयोगी पडावी या विचाराने एका निवृत्त अधिका-यांने सुमारे दीड कोटी रुपये किमतीचे घर जागेसह दान केले आहे. त्याचा औपचारिक सोहळा लवकरच केला जाणार आहे.

जळगावात घरांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. असे असताना त्या वाढीव किमतींचा मोह न बाळगता सव्वातीन हजार चौरस फुटांच्या जागेसह 1185 चौरस फूट बांधकाम असलेले राहते घरच भागवत पाटील यांनी गरीब होतकरू मुलांसाठी काम करणा-या विद्यार्थी सहायक समितीला दान केले आहे. गुरुदत्त कॉलनीतील या मालमत्तेचे बाजारमूल्य दीड कोटी रुपये आहे.

राज्य शासनाच्या उपमुख्य लेखापाल पदावरून 1989ला सेवानिवृत्त झालेले भागवत पाटील सध्या 83 वर्षाचे आहेत. 1980पासून जळगाव शहरात त्यांचे वास्तव्य आहे. त्यांना अपत्यलाभ झाला नाही. मात्र, त्याचं शल्य त्यांना अजिबात नाही. सहा भाऊ आणि त्यांची अपत्ये यांना आपण वेळोवेळी मदत करतच आलो असल्याचे पाटील म्हणाले.

मुलींचे वसतिगृह उभारण्याची इच्छा
या जागेवर विद्यार्थी सहायक समितीने मुलींचे वसतिगृह करावे अशी पत्नी मालतीबार्इंची इच्छा आहे. अर्थात, या जागेवर आता समितीची मालकी असल्याने तिथे काय करायचे हे समितीनेच ठरवावे. आम्ही हस्तक्षेप करणार नाही.
भागवत पाटील, जळगाव

आता वृद्धांसाठीही कार्य करणार
भागवत पाटील यांनी केलेली मदत अमूल्य आहे. पाटील दांपत्य समितीसाठी आई-वडिलांप्रमाणे आधार बनले आहेत. आता शहरातील वृद्धांचा सांभाळ करण्याचा प्रकल्पच समितीने हाती घेतला आहे.
प्राचार्य डॉ.एस.एस.राणे, जळगाव