आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सव्वा काेटींची तंबाखू चाळीसगावात पकडली, घातक असल्याचे चित्र छापल्याने कारवाई

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - तंबाखूच्या पुडीवर अाराेग्यास घातक असल्याचा संदेश छापल्याने अन्न अाैषध प्रशासन विभागाने चाळीसगाव येथील व्ही.एच. पटेल अॅड कंपनीवर छापा टाकून कारवाई केली. यात त्यांनी दाेन मिनिडाेअरमधील काेटी २४ लाख ३८ हजार रुपयांचा तंबाखू साठा जप्त केला अाहे.

तंबाखूजन्य पदार्थ्यांची विक्री करताना त्या उत्पादनांच्या पॅकिंगवर सिगारेट तंबाखूजन्य कायदा २००३ नुसार अाराेग्यास हानीकारक असल्याचे चित्र संदेश छापणे बंधनकारक अाहेे. चाळीसगाव येथील पटेेल कंपनीमध्ये सूर्य छाप तंबाखूवर अशी माहिती नसल्याने अन्न अाैषध प्रशासनाच्या पथकाने गुरुवारी कंपनीच्या दाेन गाड्यांवर छापा टाकला. अन्न अाैषध प्रशासन विभागाचे सहायक संचालक एम.डी. शाह यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी दिलीप साेनवणे यांनी ही कारवाई केली. सिगारेट तंबाखूजन्य पदार्थ कायदा २००३, नियम २००८ अंतर्गत तंबाखूचा साठा जप्त केला अाहे.

२०काेटींची उलाढाल ठप्प
तंबाखूजन्यपदार्थ विक्रीच्या पाकिटावरील सूचनेबाबत केंद्र सरकारने जारी केलेल्या नवीन अटीमुळे जिल्ह्यातील तंबाखू कारखाने बंद अाहेत. महिनाकाठीची २० काेटींची उलाढाल ठप्प झाली अाहे.

कर्नाटकात तंबाखू अायात
जळगावजिल्ह्यात व्ही.एच.पटेल एच.एच.पटेल या दाेन तंबाखूजन्य कंपन्या असून त्यांच्याकडून महाराष्ट्रासह, कर्नाटकात तंबाखूची अायात केली जाते. अमळनेर ३, जामनेर २, चाळीसगाव तर धुळे येथे तंबाखूची एक कंपनी अाहे.

कारवाईबाबत गुप्तता
कंपनीवरछापा टाकल्याची माहिती चाळीसगावात नव्हती. तसेच पाेलिसांनाही त्याची माहिती नव्हती. कंपनी व्यवस्थापनातील अधिकारी संचालकांचे दूरध्वनी बंद हाेते. अन्न अाैषध प्रशासन विभागाने कारवाईबाबत गुप्तता पाळली.