आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंजिठा चाैफुलीवर भरधाव ट्रकच्या धडकेत 1 व्यापारी ठार; 2 जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जखमी अनिल व आदी रेड्डी. - Divya Marathi
जखमी अनिल व आदी रेड्डी.

जळगाव - वाहतुकीसाठी धोकादायक बनलेल्या अजिंठा चौफुलीवर सोमवारी सकाळी ६.३५ वाजता पुन्हा एक अपघात झाला. भरधाव ट्रकने दुचाकीला जाेरदार धडक दिली. त्यामुळे दुचाकीस्वाराच्या पाठीमागे बसलेले भुसावळचे व्यापारी सत्ती श्रीनिवास सत्ती नारायण रेड्डी हे जागीच ठार झाले तर दाेन जण जखमी झाले. गेल्याच अाठवड्यात २९ नोव्हेंबरला देखील चाैफुलीवर ट्रकच्या धडकेने एका पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला होता. शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग इतर मुख्य मार्गावर दुभाजक नसल्यामुळे या चौकातून वाहने भरधाव वळण घेत असल्याने जीवघेणे अपघात हाेतात. सोमवारी देखील ट्रकचालकाने भरचौकात भरधाव वळण घेत असताना दुचाकीला धडक दिली अन् अपघात घडल्याचे बाेलले जात अाहे.

 

भुसावळ येथील श्रीनगरातील स्टिलच्या भांड्यांची विक्री करणारे व्यापारी सत्ती श्रीनिवास सत्ती नारायण रेड्डी (वय ४०), आदी सुरैय्या रेड्डी (वय ३५) अनिल अंजलअय्या एटकल्ली (वय ३२) हे तिघे साेमवारी जळगावत बारकल नावाच्या मित्रांच्या लग्नासाठी येत हाेते. त्यासाठी ते भुसावळ येथून सकाळी वाजता एकाच दुचाकीने (क्रमांक एमएच-१९, सीएम १२९३) जळगावात येत हाेते. सकाळी ६.३५ वाजता ते अजिंठा चौफुली येथे पोहाेचले. चौफुलीवरून नेरीनाकाकडे येण्यासाठी त्यांनी वळण घेतले. त्याच वेळी औरंगाबादकडून भुसावळकडे जाण्यासाठी निघालेल्या ट्रकने (क्रमांक जीजे-०३, बीटी, ९३३५) भरधाव वेगात वळण घेतले. त्यामुळे ट्रकच्या क्लिनर साइडची दुचाकीला जाेरात धडक बसली. त्यामुळे दुचाकीवर सर्वात पाठीमागे बसलेले श्रीनिवास रेड्डी यांना ट्रकचा फटका बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातात त्यांच्या चेहऱ्याचा चेंदामेंदा झाला. तर दुचाकी पुढे जाऊन रस्त्याच्या कडेला फेकली गेली. यात आदी रेड्डी अनिल एटकल्ली हे दोघे जखमी झाले. अपघातानंतर नागरिकांनी जखमी मृत श्रीनिवास यांना जिल्हा रुग्णालयात आणले. याप्रकरणी ट्रकचालक मोहम्मद अहमद याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

अशी पटली ओळख
श्रीनिवाससह तिघे जण जळगावला मित्राच्या लग्नासाठी येत होते. तर त्यांचा आणखी एक मित्र गंगाधर राजेंद्र पोराबत्तीवार (रा.मनोजनगर, पारोळा) हा देखील या लग्नात येणार होता. यासाठी सकाळी ६.४५ वाजता गंगाधर याने श्रीनिवास यांच्या मोबाइलवर फोन केला होता. फोनवरील काॅल इच्छादेवी चौकात राहणारे नाना सुरेश सोनवणे यांनी उचला. त्या वेळी साेनवणे यांनी गंगाधर यांना आपण फोन करीत असलेल्या व्यक्तीचा अपघात झाला आहे, असे सांगितले. त्यामुळे गंगाधर यांनी जळगावात येऊन जिल्हा सामान्य रुग्णालय गाठले. तेथे त्यांनी मृतदेह पाहिल्यानंतर श्रीनिवास यांची ओळख पटवली. तर इतर दोघे जखमींशी बोलून त्यांच्या घरी अपघाताची माहिती कळवण्यात अाली. दुपारी वाजता शवविच्छेदन करून श्रीनिवास यांचा मृतदेह कुटंुबीयांच्या ताब्यात देण्यात आला. मृत श्रीनिवास यांच्या पश्चात पत्नी दोन मुली असा परिवार आहे. सर्व नातेवाईक विजयवाडा येथेच राहत असल्यसामुळे श्रीनिवास यांचा मृतदेह मूळगावी नेला.

 

पाचव्या दिवशी दुसरा बळी
अजिंठा चौफुलीवर प्रचंड प्रमाणात वाहतुकीची कोंडी होते. वाहनांची संख्या पाहता रस्ता अरुंद पडतो. वाहतूक पाेलिसाच्या कामचाेर वृत्तीमुळे वाहतूकप्रश्न सुटण्याएेवजी अधिकच बिकट हाेत अाहे. २९ नोव्हेंबरला ट्रकच्या धडकेमुळे रघुनाथ कळसकर या ५५ वर्षीय पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. तर सोमवारी श्रीनिवास यांनादेखील अपघातात जीव गमवावा लागला आहे. अजिंठा चौफुलीने अाठवडाभरातच दाेन जणांचे बळी घेतल्याने वाहनधारकांमध्ये संताप व्यक्त केला जात अाहे.

 

व्यवसायासाठी भुसावळात
श्रीनिवास, अनिल, आदी हे तिघे मूळचे विजयवाडा (आंध्र प्रदेश) येथील रहिवासी आहेत. ते स्टिलच्या भांड्यांची विक्री करण्याचा व्यवसाय करतात. याच व्यवसायाच्या निमित्ताने आठ वर्षांपूर्वी ते भुसावळ शहरात स्थायिक झाले आहेत.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, फोटोज...

बातम्या आणखी आहेत...