आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चार मजली इमारतीमधून 11 टन प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त, विक्रेत्याला 20 हजार दंड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी प्लास्टिक पिशव्यांवर बंदीची घाेषणा केल्यानंतर जळगाव महापालिकेने किरकाेळसह हाेलसेल विक्रेत्यांवर धडक कारवाई सुरू केली अाहे. बुधवारी केलेल्या कारवाईत पुन्हा न्यू शिव प्लास्ट अॅण्ड पॅकेजिंग या दुकानात तब्बल ११ टन माल सापडला अाहे. एवढ्या माेठ्याप्रमाणात साठा जप्तीची ही राज्यातील पहिलीच कारवाई असल्याचे सांगितली जात अाहे. विक्रेत्याला तातडीने २० हजारांचा दंड करण्यात अाला अाहे. 
 
पावसाळ्यात पाणी तुंबणे, गटारीचे पाणी रस्त्यावरून वाहने, नाला अाेव्हरफ्लाे हाेणे, घरांमध्ये पाणी शिरणे, यासारख्या अनेक समस्यांचे मूळ म्हणजे प्लास्टिक पिशव्यांचा अवास्तव वापर विक्री हाेय. महापालिकेच्या प्रभारी अायुक्तांनी मुख्य बाजारपेठेतील अतिक्रमणाविरुद्ध माेठी माेहीम सुरू केली अाहे. यासाठी सर्व विभागांचे अधिकारी कर्मचारी रस्त्यावर उतरवले अाहेत. अतिक्रमणासाठी उपयाेगी ठरेल अशा प्रत्येक बाबीवर लक्ष ठेवले जात अाहे. मंगळवारी पाेलनपेठेतील दाेन विक्रेत्यांची तपासणी केली असता, त्यांच्याकडे १७६ किलाे वजनाच्या प्लास्टिक पिशव्या अाढळून अाल्या हाेत्या. त्यापाठाेपाठ दुसऱ्याच दिवशी बुधवारी पुन्हा न्यू शिव प्लास्ट या दुकानात कारवाई करत ११ टन साठा पकडून विक्रेत्यास २० हजारांचा दंड करण्यात अाला. 
 
माल अाढळल्यास दुकान बंद करेल : मंगळवारच्याकारवाईत जप्त केलेल्या प्लास्टिक पिशव्यांच्या साठाप्रकरणी अाराेग्य अधीक्षक एच.एम.खान, निरीक्षक रमेश कांबळे, अानंद साेनवाल, दिनेश गाेयर हे बुधवारी सकाळी शनिपेठ पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी गेले. त्यासाठी दुकान मालक विनय माेहनलाल खानचंदाणी यांना बाेलावण्यात अाले. पाेलिस अधिकाऱ्यांसमाेर खानचंदानी यांनी पालिकेने दाखवलेला साठा जास्त असून प्रत्यक्षात कमी माल हाेता. बुधवारीही दुकानात केवळ ३० किलाेपेक्षा जास्त माल असल्यास दुकान बंद करेल, असा दावा केल्याचे अाराेग्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 
 
चाैथ्या मजल्यावर सापडला साठा : न्यूशिव प्लास्टिक या दुकानात अाणखी माल असल्याची माहिती निरीक्षक अानंद साेनवाल दिनेश गाेयर यांना मिळाली. दाेघांनीही बुधवारी सकाळी १०.३० वाजता थेट दुकानात प्रवेश करत चाैथ्या मजल्यावर पाहणी केली असता, त्या ठिकाणी ५० मायक्राॅनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांचे पॅकिंग कट्टे अाढळून अाले. ३० बाय २० अाकाराच्या खाेलीत प्रचंड माल असल्याची माहिती अाराेग्याधिकारी उदय पाटील यांना देण्यात अाली. त्यानंतर अधीक्षक अशाेक नेमाडे, एस.बी.बडगुजर, एस.पी. अत्तरदे, रमेश कांबळे यांच्यासह रवींद्र कदम पथक दाखल झाले. त्यांनी संपूर्ण चारही मजल्यांची तपासणी केली असता, त्या ठिकाणी दाेन ट्रक भरतील एवढा माल असल्याचे लक्षात अाले. या वेळी अाराेग्याधिकारी डाॅ. विकास पाटील हे दुपारपासून तळ ठाेकून हाेते. 
 
वजन कमी पण दिसायला भरपूर 
शहरातदरराेज २०० टन कचरा संकलन केले जाते. यात सगळ्यात जास्त कचरा हा प्लास्टिक पिशव्यांशी निगडीत पाहायला मिळताे. दिसायला जास्त असला तरी वजनाने कमी असताे. त्यामुळे पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या अंदाजानुसार एकूण कचऱ्याच्या टक्के प्लास्टिक कचरा दरराेज बाहेर पडताे. घनकचरा प्रकल्पातील वजनकाटा बंद असल्याने सध्या तरी केवळ अंदाज व्यक्त करणे पालिकेच्या हाती असल्याचे सांगितले जात अाहे. 
 
दुकानदारा कडून लपवालपवी 
पालिकापाेलिसांकडून अाता कारवाई हाेणार हे लक्षात येताच न्यू शिव प्लास्टिकच्या दुकानदाराने कामगाराच्या मदतीने चाैथ्या मजल्यावरील साठा लपवण्यास सुरुवात केली. अधिकारी घटनास्थळी पाेहचत नाही ताेपर्यंत निम्मा माल शेजारच्या जागेत लपवून ठेवण्यात अाला. दुकानदाराकडून काळेगाेरे करीत असल्याचे लक्षात अाल्यानंतर पथकाने चाैथ्या मजल्यावरील तपासणी केल्यानंतर माेठे पाेते लपवल्याचे उघड झाले. तसेच कारवाई सुरू हाेताच बाहेरगावाहून माल घेऊन येणारा ट्रक परतवण्यात अाल्याचे सांगितले जात अाहे. 

अधिकाऱ्यांना राजकारण्यांचे फाेन 
महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी माेठी कारवाई सुरू करताच दुकानदाराकडून दबावतंत्राचा वापर सुरू झाला. अाराेग्य विभागाच्या बऱ्याच अधिकाऱ्यांना पालिकेतील तसेच पालिकेशी संबंधित वरिष्ठ राजकीय पदाधिकाऱ्यांचे फाेन सुरू झाले हाेते. परंतु दबाव झुगारत कारवाई सुरूच ठेवण्यात अाली. 
 
दंड, शिक्षेची तरतूद 
प्लास्टिकपिशव्यांचे विघटन होत नसल्याने त्यापासून पर्यावरणाला माेठ्याप्रमाणावर धाेका असल्याने राज्य शासनाने ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी अाणली आहे. विशेष म्हणजे, या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कायदेशीर तरतूद करून ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांचे उत्पादन वा व्रिकी करताना आढळल्यास संबंधितांविरोधात एक ते पाच लाख रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येणार अाहे. तसेच, पाच वर्षांच्या शिक्षेचीदेखील कायद्यात तरतूद करण्यात आली अाहे. 
बातम्या आणखी आहेत...