आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कत्तलीसाठी बैल घेऊन जाणारा ट्रक पकडला, १० बैलांची सुटका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाचाेरा- चाळीसगावहून औरंगाबादकडे कत्तलीसाठी जाणारे दहा बैल नागरिकांच्या सतर्कतेमुळे बचावले. लाख रुपये किमतीच्या आयशर गाडीसह लाख रुपये किमतीचे बैल ग्रामीण पोलिस ठाण्यात जप्त करण्यात आले असून, दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अाठवड्यातली ही तिसरी घटना अाहे.

कन्नड घाटमार्गे चाळीसगावहून औरंगाबादकडे एमएच-१८/बीए-५१९२ या आयशरमधून दहा बैलांची वाहतूक होत असल्याची मािहती पशुप्रेमींना मिळाली. त्यांनी पाेलिसांच्या मदतीने हा आयशर अडविला. चालकाजवळ बैल वाहतुकीचा परवाना नव्हता. बैल कत्तलीसाठी जात असल्याची खात्री पोलिसांना झाली.

बैलांसह आयशर ग्रामीण पोलिस ठाण्यात आणण्यात आला. याप्रकरणी पोलिस नाईक अनंत चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात चालक शेख जाकीर शेख रज्जाक (रा.इस्लामपुरा वाॅर्ड, मालेगाव) इब्रािहम खान अकबर खान (रा.जुना मोहल्ला, चाळीसगाव) या दोघांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. गाय तसेच बैलांची वाहतूक वारंवार हाेत अाहे.
बातम्या आणखी आहेत...