आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लँडलाइनवर १० तास ‘फ्री काॅलिंग’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - तोट्यात खासगीकरणाच्या दिशेने चाललेल्या बीएसएनएलने आता ग्राहकांसाठी तासन् तास माेफत बोलण्याची योजना आणली आहे. मेपासून (महाराष्ट्र दिन) जळगाव जिल्ह्यातील बीएसएनएलच्या ८० हजार लँडलाइन दूरध्वनीधारकांना २४ तासांतील १० तास मोफत बोलण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. यामुळे देशातील कोणत्याही फोनवर तब्बल १० तासांचा मोफत संवाद साधण्याची एक अनोखी भेट बीएसएनएलने दिली आहे. भारतीय संचार निगम लिमिटेड म्हणजेच बीएसएनएलच्या लँडलाइन दूरध्वनीवरून आता देशभरातील कोणत्याही कंपनीच्या मोबाइलवर अथवा लँडलाइनवर अमर्याद मोफत बोलण्याची ही खास योजना सुरू होणार आहे.

रात्री ते सकाळी या वेळेतच अमर्याद मोफत बोलण्याची ही सुविधा खास बीएसएनएल ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे. येत्या एक मे रोजी या सुविधेचा शुभारंभ होणार आहे, असे दूरसंचार विभागाने कळवले आहे. विशेष म्हणजे बीएसएनएल ग्राहकांच्या सध्या सुरू असलेल्या कोणत्याही प्लॅनवर या सुविधेचा लाभ मिळणार आहे.

जिल्ह्याच्या शहरी आणि ग्रामीण भागातील बीएसएनएलच्या सर्व ग्राहकांना या मोफत सेवेचा लाभ मिळणार आहे. लँडलाइन दूरध्वनीच्या सर्वसाधारण योजना, विशेष योजनेंतर्गत ब्रॉडबँड इंटरनेट सुविधा प्लॅन आणि सर्व प्रमुख योजनांना या मोफत सेवेचा फायदा मिळणार आहे. या योजनेमुळे बीएसएनएलधारकांना लाभ हाेईल.

जिल्ह्यात ८० हजार ग्राहक बीएसएनएलचे
जिल्ह्यातबीएसएनएलची दीड लाखांपर्यंतच लँडलाइन जोडण्या देण्याची क्षमता आहे. सध्या जिल्ह्यात ८० हजार २४२ एवढ्या लँडलाइनच्या जोडण्या आहेत.या सर्व या ग्राहकांना ही मोफत काॅल करण्याची सुविधा मिळणार आहे. दूरध्वनीबाबतच्या मोफत सेवेसंदर्भात अधिक माहितीकरिता www.bsnl.co.in वर ग्राहकांना विस्तृत तपशील उपलब्ध करून दिला आहे, असे दूरसंचार विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

सुविधा अशी मिळणार सेवा
>सिटी-बीएसएनएलच्या लँडलाइनवर १० तास असणार मोफत कॉलिंग
>रात्री ते सकाळपर्यंत देशातील कोणत्याही फोनवर मोफत कॉलिंग
>जळगाव जिल्ह्यातील ८० हजार ग्राहकांना मोफत सुविधेचा लाभ