आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

१० लाखांच्याच कारची चाेरी; चाेरट्याची कबुली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - एमअायडीसी पाेलिसांच्या पथकाने साेमवारी अटक केलेला चाेरटा केवळ १० लाखांपेक्षा अधिक किमतीच्याच कार चाेरायचा. त्याने अातापर्यंत मुंबई, नाशिक, सुरत उत्तर प्रदेशातून नव्या १४ कार चाेरल्याची कबुली पाेलिसांना दिली अाहे. तसेच या चाेरलेल्या कार अलाहाबादमार्गे नेपाळला विक्री केल्याची शक्यता अाहे. त्याला मंगळवारी न्यायालयाने सात दिवसांची पाेलिस काेठडी सुनावली अाहे.
एमअायडीसी पाेलिस ठाण्यात जून राेजी नितीन काटाेले (रा.शिरसाेली) यांची गाडी चाेरीला गेली हाेती. या प्रकरणात एमअायडीसी पाेलिस ठाण्याचे निरीक्षक बी.के.कंजे यांना मिळालेल्या माहितीनुसार सहायक पाेलिस निरीक्षक अार.टी.धारबळे, रत्नाकर झांबरे, रामकृष्ण पाटील, बशीर तडवी, संदीप पाटील, शशिकांत पाटील, विजय पाटील, नितीन बाविस्कर, अशाेक भजना अाणि किशाेर पाटील यांच्या पथकाने साेमवारी अजिंठा चाैफुलीवर सापळा रचला. पथकाने एका विनाक्रमांकाची शेवलेराे कंपनीची एन्जाॅय कार अडवली. या वेळी कारचालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला असता, पाेलिसांनी त्याला पकडले हाेते. यात कारचालक अनिलकुमार ऊर्फ सुबेश श्रीकांत मिश्रा (वय १८, रा.परसिधी, ता.काेराव, जि.अलाहाबाद, ह. मु.काेपरखैरणे, मुंबई) याला पाेलिसांनी ताब्यात घेतले हाेते.

चाेरीत तिघे साथीदार
अनिलकुमारसाेबततीन मित्रही असल्याचे त्याने सांगितले. यात अमित तिवारी, कल्लू तिवारी अाणि पिंटू तिवारी (रा.अलाहाबाद) यांनी चाेरी करण्यासाठी साथ दिल्याचे त्याने सांगितले. तसेच चाेरी केलेल्या गाड्या वरणगाव, धुळे, अलाहाबाद, रिवा, मिर्झापूर, हटिया, दसवार, गाेरखपूर अाणि रायपूर परिसरात कमी किमतीत विकल्या.

येथून चाेरल्या कार
मुंबईच्याहाेंडा शाेरूममधून तवेरा, तुर्भे येथून शेवलेराे, नाशिक गॅस एजन्सीतून टाटा इंडिका, ठाण्यातून मारुती कार तवेरा कार, काेपरखैरणे येथून शेवलेराे एन्जाॅय कार, तलासरी येथून जीप, सुरत येथून तवेरा, लालगंज येथून दाेन तवेरा, अलाहाबाद येथून तवेरा, मांडा कुलाटी येथून तवेरा, मिर्झापूर येथून शेवलेराे एन्जाॅय कार लांबवल्या.
बातम्या आणखी आहेत...