आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुत्र्यांनी 10 जणांना चावे घेऊन केले गंभीर जखमी, तरुणांसह महिलाही जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - शहरात मोकाट कुत्र्यांचा उच्छाद सुरुच असून शनिवारी शहराच्या वेगवेगळ्या भागात दहा जणांना मोकाट कुत्र्यांनी चावे घेतल्याची घटना घडली. कुत्र्यांच्या हल्ल्यात तरुणांसह महिलांनाही जखमी झाल्या असून त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.
 
शहरासह जिल्हाभरात गेल्या काही दिवसांपासून माेकाट कुत्र्यांचा त्रास वाढला अाहे. शनिवारी एकाच दिवसात जळगाव शहरातील सिंधी कॉलनीमधील लक्षता राजपाल (वय १०), लक्ष्मी नगरमधील नवसादबी सय्यद अली (वय ५०), जळगाव येथील अरूण पिंजारी (वय ३९) उमेश पाटील (वय २१), केसी पार्कमधील अशोक अमृतकर (वय ६३) तर भादली येथील अजय धनगर, भुसावळ येथील सलमा बी सादीक खाटीक (वय ५५), ममुराबाद येथील कैलास पाटील (वय ५० ), विटनेर येथील देविदास भगत (वय २८), पाळधी येथील मोईन शेख (वय १८) यांना माेकाट कुत्र्यांनी चावे घेतले. या सर्वांवर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात अाले. दरम्यान, सण-उत्सवाच्या काळात मोकाट कुत्र्यांचा उच्छाद वाढल्याने नागरिकांमध्ये भिती वाढली असून बंदोबस्त करण्याची मागणी केली जात अाहे.
बातम्या आणखी आहेत...