आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रेल्वेत लुटमार करणारे 10 दरोडेखोर 11 तासांत जेरबंद, चाकू, मोबाइल 4500 रुपये रोख हस्तगत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - नंदुरबार ते चावलखेडा दरम्यान धावत्या रेल्वेत प्रवाशांना चाकूचा धाक दाखवून दरोडा टाकणाऱ्या १० दरोडेखोरांना पोलिसांनी गुन्हा घडल्यापासून ११ तासांत अटक केली. शहर पोलिसांसह नंदुरबार, भुसावळ येथील लोहमार्ग पोलिसांनी एकत्रित कामगिरी करून हा मोठा गुन्हा उघडकीस आणला, अशी माहिती पोलिस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. 
 
बांद्रा पटना व्हाया उधना (१९०४९) या एक्स्प्रेसमध्ये सोमवारी मध्यरात्री १५-२० दरोडेखोरांनी चाकूचा धाक दाखवून अनेक प्रवाशांचे मोबाइल, पैसे लुटले. हे सर्व दरोडेखोर जळगाव शहरातील वेगवेगळ्या भागात राहणारे आहेत. नंदुरबार येथे उरूसनिमित्त ते रविवारी गेले होते. सोमवारी रात्री परतीच्या प्रवासात त्यांनी प्रवाशांना लुटले. रेल्वे नंदुरबार शहरापासून काही अंतर पुढे आल्यानंतर लागलीच त्यांनी चाकूचा धाक दाखवून लुटमार सुरू केली. अनेक प्रवाशांना मारहाणही केली. चावलखेडा येथे क्रॉसिंगच्या ठिकाणी रेल्वेचा वेग कमी होताच उड्या मारून त्यांनी पलायन केले हाेते. त्यानंतर सर्वजण पायी चालत पिंप्री या गावात गेले. पहाटे मिळेल त्या वाहनांनी ते जळगाव शहरात परतले होते. या लुटमारीनंतर नंदुरबार लोहमार्ग पोलिस ठाण्यात एका फिर्यादीने गुन्हा दाखल केला. त्यानंतर तेथील पोलिसांनी शोधकार्य सुरू केले. मंगळवारी सायंकाळी हे पथक जळगावात दाखल झाले होते. त्यांनी शहर पोलिस ठाण्यात येऊन संशयितांची माहिती काढण्याचे काम सुरू केले. शहर पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार नंदुरबार येथे उरूससाठी गेलेल्या शहरातील काही दरोडेखोरांनीच हे कृत्य केल्याचे समोर आले. त्यानंतर मंगळवारी रात्री १० वाजेपासून अटकसत्र सुरू झाले. रात्री २.३० वाजेपर्यंत एकूण १० संशयितांना अटक केली. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून चाकू, मोबाइल ४५०० रुपये हस्तगत केले. या गुन्ह्यात आणखी ते संशयित असून पोलिस त्यांचा शोध घेत आहे. अटकेतील संशयितांना नंदुरबार लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात दिलेे. 
 
पथकांची संयुक्त मोहीम 
लोहमार्गपोलिस जळगावात दाखल झाल्यानंतर पोलिस अधीक्षक कराळे, उपअधीक्षक बच्चन सिंह, उपअधीक्षक सचिन सांगळे यांनी ‘जॉइंट ऑपरेशन’चे नियाेजन केले. त्यानंतर पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर, वासुदेव सोनवणे, संजय शेलार, विजयसिंग पाटील, सुनील पाटील, गणेश शिरसाळे, अक्रम शेख, अमोल विसपुते, इम्रानअली सय्यद, नवजीत चौधरी, दुष्यंत खैरनार, संजय भालेराव, प्रणेश ठाकूर, प्रितम पाटील, मोहसीन बिराजदार, दीपक सोनवणे यांच्यासह नंदुरबार, भुसावळ येथील लोहमार्ग पोलिसांच्या मदतीने चार स्वतंत्र पथक तयार केले. या पथकांनी संपूर्ण शहरात संशयितांचा शोध सुरू केला. या ‘जॉइंट ऑपरेशन’मुळे मध्यरात्री २.३० वाजेपर्यंत १० दरोडेखोरांना पकडण्यात यश आले. बुधवारी सुरत लोहमार्ग पोलिसांचे उपअधीक्षक पांडे यांचे पथकही जळगावात दाखल झाले होते. 
 
नातेवाइकांचा संताप 
बुधवारीदुपारी १.३० वाजता दरोडेखोरांना पोलिस अधीक्षक कार्यालयात आणण्यात आले होते. या वेळी एकाचे नातेवाईक देखील तेथे हजर झाले. घडल्या प्रकाराबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला. 
 
नागपुरातही गुन्हा 
खोटेनगरपरिसरातील शेख मोईन शेख रहीम या मजुराचा मोबाइलही दरोडेखोरांनी लंपास केला. तो पेंटरसोबत मजुरी करतो. त्याने हप्त्याने १८ हजार रुपयांचा मोबाइल खरेदी केला होता. हा मोबाइल लांबवला आहे. त्याने प्रवास पूर्ण करून नागपूर येथील लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. 
 
हे आहेत संशयित 
अन्वरसलीम भिस्ती ऊर्फ अन्नू (रा.बळीरामपेठ), अजगर खान ऊर्फ युसूफ खान ऊर्फ भोलू, शाहरूख खान युसूफ खान ऊर्फ काल्या शाहरूख (दोघे रा.शिवाजीनगर हुडको), वसीम खान यासिन खान पठाण ऊर्फ टप्पू, साबीर शेख जहाँगीर शेख, जुबेर शेख हुसनोद्दीन शेख ऊर्फ छुट जुबेर (तिघे रा.शिवाजीनगर), अलीम अहमद शेख मुख्तार ऊर्फ चापल्या (रा.उस्मानिया पार्क), सलमान सिराज भिस्ती (शाहूनगर), अनसखा आसिफ खान, मोहसीन शेख हानिफ शेख (दोघे रा.मास्टर कॉलनी) 
बातम्या आणखी आहेत...