आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॅशलेस व्यवहारासाठी बँकांनी मागवले १० हजार स्वॅप मशीन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - अधिकाधिककॅशलेस व्यवहार होण्यासाठी स्टेट बँक, सेंट्रल बँक इतर बँकांनी मिळून जिल्ह्यात १० हजार स्वॅप मशीनची मागणी करण्यात आली आहे. तसेच कॅशलेस व्यवहारासाठी ऑनलाइन पेमेंटच्या विविध पर्यायांबाबत बँकांकडून नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे.
शासनाने आता व्यवहार पारदर्शक होण्यासाठी अधिकाधिक कॅशलेस व्यवहारांवर भर दिला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून कॅशलेस व्यवहार वाढले आहेत. दरम्यान, कॅशलेस व्यवहारासाठी जिल्ह्यात सद्य:स्थितीत स्वॅप मशीनची उपलब्धता नाही. त्यामुळे बँकांकडे स्वॅप मशीनची मागणी वाढत आहे. व्यापाऱ्यांना स्वॅप मशीन उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यातील बँकांनी वरिष्ठ कार्यालयाकडे १० हजार स्वॅप मशीनची मागणी केली आहे. येत्या दहा-बारा दिवसांमध्ये हे मशीन जिल्ह्यात उपलब्ध होतील.

५१३अल्ट्रा स्मॉल बँका
सेंट्रलबँक आॅफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडियासह इतर बँकांनी मिळून ग्रामीण भागांमध्ये ५१३ अल्ट्रा स्मॉल बँका सुरू करण्यात आल्या आहेत. या बँकांमध्ये ५१३ बँक मित्रांची नेमणूक करण्यात आली आहे. जेथे बँक सुविधा पाेहोचलेली नाही, असे दोन-तीन गाव मिळून एक अल्ट्रा स्मॉल बँक सुरू करण्यात आली आहे. या बँकेत बँक मित्रांकडे स्वॅप मशीन देण्यात आली आहे. या मशीनच्या सहायाने ग्राहकांना बँक खात्यात पैसे जमा करता येतात. पैसे काढण्याचीही सुविधा आहे. ग्रामीण भागातील छोट्या घटकांसाठी ही सुविधा उपयोगी पडणार आहे. या स्वॅप मशीनच्या सहायाने अगदी शंभर रुपयेही बँकेत जमा करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली अाहे. हे स्वॅप मशीन बँकांच्या सर्व्हरशी जोडलेले अाहे.
शहरातील पेट्रोल पंपांवर दोन
हजारांच्या नोटा घेण्यास नकार

दोनहजार रुपयांच्या नोटा एटीएममधून नागरिकांना मोठ्या प्रमाणावर मिळत आहेत. शहरातील मोजक्याच पेट्रोल पंपांवर स्वॅप मशीनची सुविधा उपलब्ध आहे. बहुतांश पेट्रोल पंपांवर स्वॅप मशीन नाहीत. त्यामुळे दोन हजार रुपयाची नोट पेट्रोल पंपावर स्वीकारण्यास नकार देण्यात येत आहे. दोन हजारांच्या नोटा स्वीकारण्यावरून पेट्रोल पंपांवर वाद होत आहेत.
पुढे वाचा,
जिल्हा बँकेच्या कॅशसंदर्भात शून्य प्रतिसाद
बातम्या आणखी आहेत...