आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सायकल चालवत भान विसरून मुलगा पोहोचला थेट मुसळीत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- सायकल चालवण्याच्या आनंदात एक १० वर्षीय मुलगा शहरातील प्रेमनगर भागातून महामार्गाने पाळधीमार्गे थेट मुसळी गावात जाऊन पोहोचला. तेथील नागरिकांनी त्याला हटकले असता आपण जळगावातून आले असल्याची माहिती त्याने दिली. ‘दिव्य मराठी’चे कर्मचारी गोपाळ पाटील यांच्या मदतीने या बालकाला सुखरूप घरी पोहोचवण्यात आले आहे. नीलेश उमाशंकर यादव असे या बालकाचे नाव आहे.

नीलेश हा प्रगती शाळेत पाचवीच्या वर्गात शिकतो. शनिवारी सायंकाळी पाच वाजता तो मित्राकडे जाण्याचे सांगून घरातून बाहेर पडला होता. त्यानंतर तो थेट मुसळी येथे पोहोचला. जळगाव शहरापासून १६ किलोमीटर अंतर कापून तो तेथे पोहोचला होता. गावात पाेहोचल्यानंतर अंधार पडायला लागला तसा तो घाबरला. त्याची अवस्था पाहून पाटील कुटुंबीयांनी त्याची चौकशी केली. त्याने जळगावातून सायकल चालवत आल्याचे सांगितले. गावकऱ्यांनी त्याच्या मनातून भीती काढून त्याला शांत केले. तसेच घरचा पत्ता, वडिलांचे नाव, मोबाइल नंबरची विचारपूस केली. नीलेशला घरचा पत्ता माहीत होता पण मोबाइल क्रमांक आठवत नव्हता. त्याचे वडील महात्मा गांधी उद्यानाच्या बाहेर आईसक्रीम विक्रीची हातगाडी लावतात, अशी माहिती त्याने दिली. त्यानुसार मुसळी गावातील काही लोकांनी बसस्थानक परिसरातील ओळखीच्या व्यक्तींना त्याच्या वडिलांकडे पाठवले. वडिलांना माहिती दिल्यानंतर त्यांनी मोबाइलवरूच नीलेश याच्याशी संवाद साधला. रात्री वाजेच्या सुमारास त्याचे काका मुसळी येथे पोहोचले त्याला घरी घेऊन गेले.

सायकलिंगचा छंद
नीलेशलासायकल चालवण्याचा छंद आहे. दोन महिन्यांपूर्वीच त्याच्यासाठी नवीन सायकल घेतली आहे. घरच्यांचे एकता तो शहरात सायकल फिरवण्यासाठी येत असतो. मात्र, महामार्गाने बाहेर सायकल फिरवण्याचा प्रकार त्याने पहिल्यांदाच केला आहे. अशी माहिती त्याचे वडील उमाशंकर यादव यांनी “दिव्य मराठी’शी बोलताना दिली.
बातम्या आणखी आहेत...