आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रात्री दीड वाजता घरी झोपला अन् अडीच वाजता पोलिसांसोबत परतला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - १०वर्षीय मुलगा रात्री १.३० वाजेच्या सुमारास झोपेत चालत गेला. अन् रात्री २.३० वाजता पोलिसांसोबत सुखरूप घरी परतला. ज्यावेळी घरच्यांना ही घटना समजली त्या वेळी तेही थक्क झाले. ही घटना एखाद्या चित्रपटातील नसून सोमवारी रात्री १.३० वाजेच्या सुमारास पिंप्राळा परिसरातील श्रीरत्न कॉलनीत घडलेला प्रकार आहे. या विचित्र घटनेमागे पालकांनी आपल्या मुलाचे अपहरणाचा प्रयत्न झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. एवढेच नव्हे तर सोमवारी पुस्तक विक्रीसाठी आलेल्या तरुणाने हा प्रकार केल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
वडिलांनीझोपवले :श्रीरत्न कॉलनीतील प्लाॅट नं. १५ मध्ये किशोर वानखेडे यांचे कुटंुब राहते. त्यांना तीन मुले आहेत. बालमोहन मराठी शाळेत त्यांचा दीपक नावाचा मुलगा व्या वर्गात शिकतो. दीपक सोमवारी प्रकृती ठीक नसल्याने लवकर झोपला. त्याचे वडील किशोर यांनी रात्री १.३० वाजेच्या सुमारास दीपकच्या अंगावर पांघरूण टाकून त्याला झोपवले. त्यानंतर दीपक झोपेत उठून घराबाहेर चालत गेला. काही अंतरावर गेल्यानंतर त्याला जाग आली. तेव्हा एका लाल रंगाच्या स्प्लेंडरवर तरुण भेटला. डो क्यात काळ्या रंगाची टोपी, चेहऱ्यावर रुमाल बांधलेला होता. त्याने दीपकला मोटारसायकलवर बसवून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक लगत असलेल्या ह्युंडाई कंपनीच्या शोरूमच्या पायऱ्यांजवळ बसवून १० मिनिटात परत येतो, असे सांगून तो पुलावरून शहराकडे गेला.
पिप्राळ्यातीलतरुण धावले मदतीला : काहीवेळानंतर पिंप्राळ्यातील चार तरुण तेथे आले. त्यांनी दीपकला रात्री याठिकाणी काय करतो म्हणून विचारले. त्या वेळी तो घाबरलेला होता. त्यांनी त्याला पत्ता विचारल्यानंतर त्याला घरी सोडण्याचा निर्णय घेतला. ते जात असताना गुजराल पंपाजवळ गस्तीवर असलेले मुरलीधर आमोदकर आणि प्रकाश महाजन हे पोलिस कर्मचारी त्यांना भेटले. त्यांनी दीपकला ताब्यात घेऊन पत्ता विचारला. वडील काय करतात, असे विचारले. वडिलांची पिप्राळ्यात पानटपरी असल्याचे त्याने सांगितले. तेथे घेऊन गेल्यानंतर त्याने घराचा रस्ता दाखवला.
आई-वडिलांनाबसला धक्का : मंगळवारीपहाटे २.३० वाजता पोलिसांनी दीपकच्या आई-वडिलांना उठवले. तुम्हाला किती मुलं आहेत. त्यापैकी घरात किती आहेत, ते विचारल्यानंतर दीपकच्या आई वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण घरात मयूर आणि दिनेश ही दोन मुले झोपलेली होती. दीपक जागेवर नव्हता. त्या वेळी पोलिसांनी त्यांच्या ताब्यात असलेल्या दीपकला पालकांच्या स्वाधीन केले.
आम्ही झोपलेलो असताना दीपक झोपेतच घरातून निघून गेला. त्यानंतर त्याला गाडीवर बसवून घेऊन जाणारा तरुण हा पुस्तक विक्री करण्यासाठी आलेल्या तरुणासारखाच होता. त्यामुळे आमचा त्याच्यावरच संशय आहे. किशोरवानखेडे, दीपकचेवडील

दाक्षिणात्य अन‌् इंग्रजीत बोलत होता
‌श्रीरत्नकॉलनी परिसरात सोमवारी एक तरुण लहान मुलांची पुस्तके विकण्यासाठी िफरत होता. त्याने वानखेडे यांच्या घरातही तुमच्या घरात मुले आहेत का? असा प्रश्न विचारून १७०० रुपयांची पुस्तके ४०० रुपयात देतो, असे सांगितले. तो तरुण दक्षिण भारतीय भाषेत आणि इंग्रजीत बोलत होता.