जळगाव : नवी पेठेतेतून १० जानेवारी राेजी माेटारसायकलची चाेरी करणाऱ्या अटल चाेरट्याला शहर पाेलिसांनी गुरूवारी सायंकाळी अटक केली. त्याच्याकडून चाेरलेली माेटारसायकल हस्तगत केली अाहे. ताे ५० ते १०० रुपयांत चाेरीच्या माेटारसायकल विक्री करीत हाेता. त्याच्यावर पुण्यातही १८ गुन्हे दाखल असल्याची माहिती पाेलिसांना मिळाली अाहे.
नवीपेठेत लक्ष्मीकांत याेगेश राठी (वय ३६) यांचे राठी ट्रेडर्स नावाचे खते अाणि बी, बियाण्याचे दुकान अाहे. १० जानेवारी राेजी सायंकाळी वाजता त्यांची माेटारसायकल (क्र. एमएच- १९, बीअार- ११९९) घरासमाेर लावली. त्यानंतर ते कुटुंबीयांसह जेवणासाठी बाहेर केले. रात्री १०.३० वाजता परत अाल्यानंतर माेटारसायकल जागेवर नव्हती. त्यामुळे त्यांनी बुधवारी याप्रकरणी शहर पाेलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून चाेरीचा गुन्हा दाखल करण्यात अाला.
याप्रकरणी तपासासाठी शहर पाेलिस ठाण्याचे निरीक्षक प्रदीप ठाकूर यांनी वासुदेव साेनवणे, विजयसिंग पाटील, प्रीतम पाटील, सुनील पाटील, दुष्यंत खैरनार, अमाेल विसपुते, संजय शेलार यांच्या पथकाला पाठवले हाेते. तपासात पथकाला पुणे येथील अट्टल माेटारसायकलचाेर समाधान गाेकुळ सपकाळे (वय २८, रा. हडपसर) हा पुणे येथून चाेरीची माेटारसायकल घेऊन शहरात अाला असल्याची माहिती मिळाली हाेती.
त्यावरून पथकाने गुरुवारी सायंकाळी वाजता शिवाजीनगर परिसरात माेटारसायकलचाेरी करण्याच्या तयारीत असताना शहर पाेलिसांच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्याने १० जानेवारी राेजी राठी यांची माेटारसायकल चाेरल्याची कबुली दिली. ती माेटारसायकल पाेलिसांनी हस्तगत केली अाहे.
तर जानेवारी राेजी समाधान याने गांधी मार्केट जवळून अाणखीन एक माेटारसायकल चाेरल्याची कबुली दिली अाहे. मात्र, ती हजार रुपयांत अडावद येथे विक्री केल्याचे त्याने सांगितले. त्यादृष्टीने शहर पाेलिस ठाण्याच्या पथकाने तपासाची चक्रे फिरवली अाहे. चाैकशी दरम्यान समाधानकडून अाणखी इतर चाेरीबाबत माहिती उघड हाेईल असा अंदाज पाेलिसांनी व्यक्त केला अाहे.
फुफणी (ता. जळगाव) येथील मूळ रहिवासी असलेला समाधान हा अनेक वर्षांपासून हडपसर येथे राहताे. त्याचे वडील गाेकुळ सपकाळे हे हडपसर येथे एका हाैसिंग साेसायटीत वाॅचमनचे काम करतात. त्याने पुणे परिसरातून १८ माेटारसायकलींची चाेरी केल्याचे पाेलिसांच्या चाैकशीत सांगितले. त्याला माेटारसायकल चाेरीप्रकरणी अडीच वर्षांची शिक्षाही सुनावली हाेती. सहा महिन्यांपूर्वीच ताे येरवडा तुरुंगातून सुटून बाहेर अाला अाहे.
पुण्यातही करत हाेता चाेऱ्या
शहरपाेलिस ठाण्यातील पथकाने अटक केलेला अट्टल माेटारसायकलचाेर समाधान याने पुण्यातून १८ माेटारसायकली चाेरल्या. त्यातील काही त्याने ५० ते १०० रुपयांमध्ये विक्री केल्याची माहिती पाेलिसांच्या चाैकशीत दिली. रात्री उशीरापर्यत पाेलिस समाधानची चाैकशी करीत असून ते त्यांच्याकडून अधिक माहिती काढत अाहे.
आजसकाळी जाणार हाेता शिर्डीला
चाेरीकेल्यानंतर समाधान माेटारसायकलची विक्री करून दुसऱ्या चाेरलेल्या माेटारसायकलवरून शुक्रवारी पहाटे ताे शिर्डी येथे तेथून तो सुरत येथे जाणार हाेता. गेल्या काही दिवसांपासून समाधान सुरत येथे काम करीत अाहे. त्यामुळे तो शिर्डी येथून परस्पर सुरत येथे जाणार हाेता. मात्र, पाेलिसांनी त्याला जेरबंद केले.
समाधान सपकाळे