आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

१०० थकबाकीदारांकडे मालमत्ता कराची दीड कोटी रुपयांचे घेणे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - महापालिकेची आर्थिक परिस्थिती खराब असल्याची ओरड प्रशासनासह सामान्य नागरिकांमध्ये सुरू आहे. तर दुसरीकडे थकबाकीदारांची संख्या आकडेदेखील डोळे विस्फरायला लावणारी आहे. चारही प्रभागातील प्रत्येकी टॉप २५ थकबाकीदारांची यादी ‘दिव्य मराठी’च्या हाती लागली असून, या १०० ‘बड्या’ नागरिकांकडे कोटी ५४ लाख ८८ हजार १२ रुपयांची येणे बाकी आहे.

शहर विकासासाठी आवश्यक असलेल्या मालमत्ता करांची वसुली सर्वात महत्त्वाची आहे. महापालिकेवर कर्जाचा डोंगर उभा आहे. जे नागरिक कर भरतात त्यांनादेखील सुविधा मिळत नाही. शहरात कचऱ्याचे ढीग पडलेले आहेत, घंटागाड्या वेळेवर येत नाहीत, रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. अशाही स्थितीत नागरिक शहरात राहत आहेत. तर दुसरीकडे अनेक बड्यांकडे लाखोंची थकबाकी आहे. वेळेवर कर भरताही सुविधेचा ते लाभ घेत आहेत. शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानासाठी पालिका प्रशासन, राजकीय मंडळी धडपड करीत असताना दुसरीकडे मात्र पालिका बड्यांकडील थकबाकी वसुलीसाठी कमी पडत आहे. पालिका आयुक्त यांनी गेल्या महिन्यात शहरातील टाॅप १०० थकबाकीदारांची यादी तयार करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार चारही प्रभागातील वसुली अधिकाऱ्यांनी आपापल्या भागातील २५-२५ थकबाकीदारांची यादी पालिकेला सादर केली आहे. आता त्यांच्याकडून वसुली करण्याचे मोठे आव्हान पालिका प्रशासनाला आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते दीपक गुप्ता यांनी यासंदर्भात माहिती मिळवली आहे.
आजी-माजीनगरसेवकही ‘यादी’त : थकबाकीदारांच्यायादीत एक माजी तर सध्याचे पाच असे एकूण सहा नगरसेवकही आहेत. त्यांनी २०१५-१६ या वर्षाचे मनपाचे विविध कर भरलेे नाहीत. नागरिकांचे प्रतिनिधीत्व करणारे नगरसेवकही थकबाकीदारांच्या यादीत असल्याची माहिती मिळाली आहे.
कारवाई होईल
थकबाकीदारांकडून वसुली करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सुरुवातीला कर भरण्यास सांगण्यात येते, त्यानंतर नोटीस शेवटी जप्तीची कार्यवाही करण्यात येईल. वसुलीच्या कामात कसूर करणाऱ्या पालिका कर्मचाऱ्यांवरही कारवाई केली जाईल. जीवन सोनवणे, आयुक्त
न्यायप्रविष्ट बाबींचा अाधार
अनेक जुने थकबाकीदार न्यायालयाचा आधार घेऊन पैसे भरण्यास टाळाटाळ करीत आहेत. मालमत्तेसंदर्भात न्यायालयात सुनावणी सुरू असल्याचे कारण पुढे करून कर भरल्यामुळे थकबाकीचे आकडे चांगलेच फुगले ओहत. प्रत्यक्षात कर वसुलीला स्थगिती मिळालेल्या प्रकरणांशिवाय इतर सर्वच बाबतीत नागरिकांनी विविध करांचे पैसे भरले पाहिजे, अशी माहिती विधी तज्ज्ञांनी दिली आहे.
बातम्या आणखी आहेत...