आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मातीचे गणपती, घरीच विसर्जन, पालिकेची पाच ठिकाणी व्यवस्था

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - गेल्या काही वर्षांत झालेल्या जनजागृतीचा परिणाम म्हणून यंदा माेठ्याप्रमाणात शाडूमातीच्या गणेशमूर्तींची स्थापना करण्यात अाली. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी इकाे फ्रेंडली गणेशाेत्सव साजरा करणाऱ्या कुटुंबांकडून अाता गुरुवारी गणरायाला निराेप देतानाही पर्यावरणहिताच्या दृष्टीने कृत्रिम विसर्जन कुंडातच विसर्जित करण्याचा कल अाहे. तर काही कुटुंबांनी घरातच गणरायाला निराेप देण्याची तयारी केली अाहे.

‘दिव्य मराठी’ने गेल्या तीन वर्षांपासून पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी जनजागृती अभियान राबवत पुढाकार घेतला अाहे. गणेश स्थापनेपूर्वी शहरातील काही विक्रेत्यांना शाडू मातीच्या मूर्ती विक्रीचा अाग्रह धरला हाेता. त्याला चांगला प्रतिसाद देत शहरातील विक्रेत्यांकडून हजाराेंच्या संख्येने शाडूमातीच्या गणपतींची विक्री करण्यात अाली हाेती. प्लास्टर अाॅफ पॅरिसपासून पर्यावरणाचे हाेणारे नुकसान जलाशयांचे हाेणारे प्रदूषण टाळण्यासाठी घेतलेल्याभूमिकेला शहरातील नागरिकांनी आणि महापालिकेनेही चांगला प्रतिसाद दिला अाहे. अाज मनाेभावे अापल्या लाडक्या गणपती बाप्पाला निराेप देण्याची वेळ अाली अाहे. गेली १० दिवस पर्यावरण संवर्धनाचा केलेला ध्यास शेवटच्या दिवसापर्यंत कायम ठेवण्याचे अावाहन ‘दिव्य मराठी’तर्फे गणेशभक्तांना करण्यात येत अाहे. शक्य असेल तर घरातील बादलीत गणरायांचे विसर्जन करावे. या व्यतिरिक्त महापालिकेने शहरात पाच ठिकाणी कृत्रिम विसर्जन कुंड तयार करून त्यात विसर्जनाची व्यवस्था केली अाहे.

मानाच्या गणपतीच्या विसर्जनाचा प्रश्न कायम
महापालिका प्रशासनाने यापूर्वीच मानाच्या गणपतीचे सागर पार्क येथे विसर्जन करण्याचा निर्णय घेतला अाहे. या सार्वजनिक गणेश मंंडळाने याला विराेध दर्शविला हाेता. त्या पाठाेपाठ उपमहापाैर ललित काेल्हेंनी या गाेष्टीला नकार दिला अाहे. १२३ वर्षांची परंपरा माेडू देणार नसल्याची भूमिका घेत एल.के.फाउंडेशन मेहरूण तलावातच मानाच्या गणपतीचे विसर्जन करेल, असे अाव्हान दिले अाहे. त्यामुळे महापालिका प्रशासन अाता काय निर्णय घेते? याकडे लक्ष लागून अाहे. महापाैर नितीन लढ्ढा यांनी यापूर्वीच पत्रकार परिषदेत मानाच्या गणपतीचे विसर्जन सागर पार्क येथील कृत्रिम तलावात करण्यात येईल, अशी माहिती दिली हाेती.

नंदिनीबाई विद्यालयात गणेशाचे विसर्जन
नंदिनीबाईविद्यालयात बुधवारी गणपती बाप्पाचे पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन करण्यात अाले. विद्यार्थिनींनी यंदा शाडू मातीपासून तयार केलेल्या मूर्तीची स्थापना केली हाेती. मूर्तीचे रंगकामही नैसर्गिक रंगांपासून तयार करण्यात अाले हाेते. या वेळी प्राचार्या के. एस. पाटील, पर्यवेक्षक अार. अार. पाटील, एन. व्ही. महाजन, हरित सेनाप्रमुख अर्चना चाैधरी उपस्थित हाेत्या.
विसर्जन मिरवणुकीसाठी १०० गणसेवक नियुक्त
शहरातील गणेशाेत्सव विसर्जनाची मिरवणूक निर्विघ्न पार पाडण्यासाठी गणेशाेत्सव महामंडळातर्फे विशेष व्यवस्था करण्यात अाली अाहे. महामंडळातफॅे ड्रेस काेडमध्ये १०० गणसेवक मिरवणूक मार्गावर मदतीसाठी उपस्थित राहतील. प्रत्येक जणांचा एक गट तयार करून असे २० गट मिरवणूक मार्गावर राहणार अाहेत. महामंंडळाच्या नियंत्रण कक्षाच्या संपर्कात राहून हे गणसेवक महिला, लहान मुले अाणि ज्येष्ठ नागरिकांना सहाय्य करतील. यासंदर्भात नियाेजनासाठी बुधवारी गायत्री मंदिरात महामंडळाच्या गणसेवकांची बैठक झाली.
शहरातील संपूर्ण मिरवणुकीत गणेशाेत्सव मंडळे अाणि पाेलिस यंत्रणा यांच्या समन्वयाचे काम महामंडळाचे गणसेवक करतील. जणांचा एक गणसेवकांचा गट असेल, एका गटासाठी एक गटप्रमुख, गणसेवक गटांचे समन्वयक अाणि गणरक्षक गटप्रमुख अशी यंत्रणा करण्यात अाली अाहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी महामंडळाचे नियंत्रण कक्ष उभारण्यात अाले असून तेथे संपूर्ण मिरवणुकीचे नियंत्रण केले जाईल. प्रत्येक ठिकाणच्या स्थितीची माहिती या कक्षात असेल. ड्रेस काेडमध्ये असलेल्या गणसेवकांकडे नागरिक मदत मागू शकतील. यासंदर्भात नियाेजन करण्यासाठी महामंडळातर्फे बुधवारी सायंकाळी गायत्री मंदिरात गणसेवकांची बैठक झाली. या बैठकीत सचिन नारळे, अनिल भाटिया, ललित चौधरी, किशाेर भाेसले, राकेश लाेहार, सूरज दायमा, मानस शर्मा, तुषार कुळकर्णी, हर्षल झाल्टे, राकेश तिवारी यांनी मार्गदर्शन केले.

वैद्यकीय सेवा
गणेशाेत्सव महामंडळ, शिवसेना अाणि विश्व हिंदू परिषद यांच्यातर्फे गणेशाेत्सव मिरवणुकीत वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात येणार अाहे. शहरातील नामांकित डाॅक्टर मिरवणुकीत वैद्यकीय सेवा पुरवणार अाहेत. तसेच श्रीराम रांगोळी ग्रुपतर्फे विसर्जन मार्गावर गुलाबाच्या पायघड्या तसेच चौका-चौकात आकर्षक रांगोळ्या काढण्यात येणार आहे.
बातम्या आणखी आहेत...