आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपा अतिक्रमण पथकाला 100 जणांनी घेरले, भर दुपारची घटना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- गेल्या काही दिवसांपासून शहरात सातत्याने अनुचित प्रकार घडत असताना रविवारी पुन्हा बोहरा मशिदीजवळील अतिक्रमणाच्या कारवाईसाठी गेलेल्या पालिकेच्या पथकाला सुमारे १०० ते १५० जणांनी घेरल्याने दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास तणावाचे वातावरण निर्माण झाले हाेते. यामुळे परिसरात पळापळ देखील झाली. 

महापालिकेचे प्रभारी अायुक्त किशोर राजेनिंबाळकर यांनी शहरातील रस्त्यांवरील अतिक्रमणाविरुद्ध मोहीम राबवण्यास सुरुवात केली अाहे. दरम्यान, रविवार असल्याने सुटीच्या दिवसाची संधी साधत काही फळ विक्रेत्यांनी राजकमल टाॅकीजच्या गल्लीत हातगाडी लावून व्यवसाय सुरू केला हाेता. शहरातील या प्रमुख भागात कारवाईसाठी पालिकेचे अधिकारी कर्मचाऱ्यांचे पथक एकेक गल्लीत शाेध माेहीम घेत असताना त्यांना विक्रेते दिसले. 

राजकमल टाॅकीजकडे पथकाने धाव घेतल्याचे लक्षात येताच फळ विक्रेत्यांनी बाेहरा मशिदीच्या मागच्या बाजूच्या गल्लीत सागर भुवनच्या चाैकाकडे धाव घेतली. पालिकेचे पथक कारवाई करत असल्याची माहिती कळताच बागवान माेहल्ला जाेशी पेठकडून सुमारे १०० ते १५० लाेकांचा जमाव सागर भुवनच्या बाजूने पळत अाला. या वेळी पालिकेचे अतिक्रमण निर्मूलन कर्मचारी फळ विक्रेत्यांचे काटे जप्त करत असल्याने त्यांना धक्काबुक्की झाल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान पालिकेच्या अधिकाऱ्यांनाही दमदाटी झाल्याचा अाराेप करण्यात अाला. 

२५ सप्टेंबरपर्यंत कारवाईचा धडाका सुरूच राहणार 
११ सप्टेंबरपासून २५ सप्टेंबरपर्यंत पालिकेचे सर्व विभाग प्रमुख कर्मचाऱ्यांना सुभाष चाैक, बळीरामपेठ, शिवाजी राेडसह शहरातील प्रमुख रस्त्यांवरील हाॅकर्सविरुद्ध कारवाई सुरू केली अाहे. त्यामुळे विक्रेत्यांना रस्त्यावर अतिक्रमण करणे अाता अशक्य झाले अाहे. या कारवाई सत्रामुळे रस्ते माेकळे झाले असून सातत्याने हाेणारी वाहतूक देखील सुरळीत झाल्याचे समाधान व्यक्त हाेत अाहे. 

बोहरा मशीद परिसरात झालेली नागरिकांची पळापळ. 
यापूर्वी देखील सागर भुवन परिसरात कर्मचाऱ्याला मारहाण झाल्याचे सांगण्यात अाले. अाता रविवारी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास पुन्हा सलमान भिस्ती या पालिकेच्या कर्मचाऱ्याच्या हाताला मार लागला. सातत्याने पालिका कर्मचाऱ्यांना विक्रेत्यांच्या दांडगाईचा सामना करावा लागत असल्याने अायुक्तांनी यासंदर्भात ठाेस कारवाई करणे गरजेचे असल्याचे पथकातील कर्मचाऱ्यांनी सांगितले. 

एकीकडे कारवाई दुसरीकडे सूट 
पालिकेच्या पथकांमधील काही लाेकांकडून माेहिमेवर शंका निर्माण हाेईल, असे कृत्य केले जात असल्याची टीका सुरू अाहे. एकीकडे पथक विक्रेत्यांचा दबाव झुगारून कारवाई करते, तर दुसरीकडे अधिकाऱ्यांच्या नावाने जप्त केलेले सामान परत केले जात असल्याचा अाराेपही हाेत अाहे. 

कारवाई केल्याने वाद 
पालिकेच्या पथकाकडून शहरात रस्त्यावरील विक्रेत्यांविरुद्ध कारवाई केली जात अाहे. रविवार असल्याने राजकमल टाॅकीजजवळ फळ विक्रेत्यांनी दुकाने लावली हाेती. त्यांच्यावर कारवाई केल्याने विक्रेत्यांनी वाद घातला. 
- एच.एम. खान, अधीक्षक अतिक्रमण विभाग 
बातम्या आणखी आहेत...