आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गरीब विद्यार्थ्यांना १०० रू. प्रवेश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - यंदादुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे माेडले अाहे. अशा परिस्थितीत पाल्यांच्या शिक्षणाचा खर्चही बळीराजासाठी डाेईजड झाल्याने अनेक विद्यार्थ्यांनी शिक्षण थांबवण्याचा निर्णय घेतला हाेता. अशा वेळी शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून स्वत: अार्थिक झळ साेसून मविप्र संस्थेच्या नूतन मराठा महाविद्यालयाने १३०० विद्यार्थ्यांना ५० ते १२० रुपयांत प्रवेश देऊन शिकण्याचे बळ दिले अाहे. संस्थेच्या निर्णयाने इतरांपुढे अादर्श निर्माण केला अाहे.
नूतन मराठा महाविद्यालयाच्या स्थापनेचे यंदा शतक महोत्सवी वर्ष आहे. यंदा जिल्ह्यासह राज्यात दुष्काळग्रस्त परिस्थिती आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण सोडण्याची वेळ आली होती. अशा वेळी मविप्र संस्थाध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्यासह संचालक मंडळाची बैठक घेतली. यात गुणवंत आर्थिक परिस्थिती बिकट आहे; अशा विद्यार्थ्यांना नाममात्र फी घेऊन प्रवेश देण्याचा अादर्श निर्णय घेतला. त्यानुसार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल.पी.देशमुख यांना निर्णयाबाबत कळवले. त्यानंतर विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठी प्रवेशप्रकिया समितीमधील प्राध्यापकांना निकष सांगण्यात आले. या समितीमधील प्राध्यापकांनी प्रवेशासाठी समोर येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांची चाचपणी करून खरोखर गरजवंत असलेल्या १३०० विद्यार्थ्यांना ५० ते १२० रुपयांत प्रवेश दिले. संस्थेच्या कोअर स्टुडंट फंड तसेच शिष्यवृत्तीमधून महाविद्यालयानेच फी अदा केली. तसेच बुक बँकमधून ३५ विद्यार्थ्यांना सर्व विषयांची पुस्तके मोफत दिली. दरम्यान, कनिष्ठ महाविद्यालयाची वार्षिक फी ५५० ते ७५० तर वरिष्ठ महाविद्यालयाची फी एक हजार ते ११०० रुपये एवढी आहे.
सव्वालाखाचा दंडही भरला :यंदा शासनाच्या निर्णयानुसार सर्वच महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी प्रवेश क्षमतेत घट केली होती. त्यानंतर जर महाविद्यालयाने वाढीव जागांवर प्रवेश दिला तर, प्रती विद्यार्थी ३०० रुपये प्रमाणे दंड विद्यापीठाकडे भरायचा होता. हा खर्च महाविद्यालयाने भरण्याची अट होती; त्यानुसार नूतन मराठा महाविद्यालयाने सव्वा लाख रुपये दंडही भरला आहे.

मराठा विद्या प्रसारकची स्थापना बहुजनांच्या शिक्षणासाठीच
^मविप्रया संस्थेची स्थापना बहुजनांच्या शिक्षणासाठी झाली. पैशांअभावी कोणत्याही विद्यार्थ्यांचे शिक्षण रोखले जाऊ नये. म्हणून संस्थेने नाममात्र फी घेऊन विद्यार्थ्यांना प्रवेश दिले आहेत. दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला. नरेंद्र पाटील, अध्यक्ष,मविप्र

अकरावीसाठी चांगली याेजना
यंदानूतन मराठा महाविद्यालयातून ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवत दहावी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांनाही महाविद्यालयात मोफत प्रवेश देण्यात आले. सुमारे ३५ विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ झाला.