आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांनाही नोकऱ्या, राज्यभर अनेक जागांसाठी होणार परीक्षा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- महाराष्ट्रभरात विविध शासकीय जागांसाठी परीक्षा होणार आहेत. यामध्ये अगदी दहावी झालेल्या विद्यार्थ्यांपासून पदवीधर विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांत संधी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. दहावी आणि बारावी झालेल्या विद्यार्थ्यांसाठी फॉरेस्ट विभागात गार्डच्या, तर एमपीएससीमध्ये स्टेनोग्राफरच्या जागा उपलब्ध आहेत.
पदवीधर विद्यार्थ्यांसाठी एमपीएससीमध्ये सहायकपदाच्या ९६ जागा उपलब्ध आहेत. या जागांसाठी कोणत्याही शाखेतील पदवीधर विद्यार्थी किंवा तत्सम शिक्षणप्राप्त विद्यार्थी जूनपर्यंत अर्ज करू शकतात. महाराष्ट्र वनविभागामध्ये फॉरेस्ट गार्डसाठी दहावी तसेच बारावी झालेले कोणतेही विद्यार्थी १० जूनपर्यंत अर्ज करू शकतात. फॉरेस्ट गार्डच्या एकूण ८१ जागा उपलब्ध आहेत. यानंतर एमपीएससीमध्ये स्टेनोग्राफरच्या जागांसाठी दहावी आणि बारावी झालेल्या विद्यार्थ्यांनी जूनपर्यंत अर्ज करायचे आहेत. स्टेनोग्राफरच्या एकूण ४९ जागा या विभागात उपलब्ध आहेत. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना अनुभवाची अट नाही. त्यामुळे फ्रेशरदेखील या जागांसाठी अर्ज करू शकतात. नेमून दिलेल्या संकेतस्थळांवर जाऊन विहित तारखेच्या आत विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज करायचे आहेत.
येत्या २३ ऑगस्टला केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी)तर्फे विविध पदांसाठी आणि जागांसाठी पूर्वपरीक्षा घेतली जाणार आहे. यामध्ये तब्बल ११२९ जागा भरल्या जाण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या पूर्वपरीक्षेसाठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख १९ जून असून, उमेदवारांना या तारखेला दुपारी १२ वाजेपर्यंत अापले अर्ज भरता येणार आहेत.
या पूर्वपरीक्षेत २४ विभागांसाठी परीक्षा होणार आहे. ज्यामध्ये इंडियन अॅडम िनस्ट्रेटिव्ह सर्व्हिस, इंडियन फॉरेन सर्व्हिस, इंडियन पोलिस सर्व्हिस, इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस यांच्यासह अन्य २१ विभागांचा सहभाग असेल. तसेच यासाठी पात्रतेच्या अटी आणि इतर माहिती उमेदवाराने केंद्रीय लाेकसेवा अायाेगाच्या संकेतस्थळावर भरावयाची आहे. एकदा भरलेली माहिती ही अंतिम गृहित धरली जाईल.
असे करावेत अर्ज
- फॉरेस्ट विभागातील गार्ड्सच्या जागांसाठी १० पर्यंत www.mahaforest.nic.in यावर अर्ज करायचे आहेत.
- स्टेनोग्राफर पदासाठी www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर जूनपर्यंत अर्ज करायचे आहेत.
- सहायक पदासाठीही उमेदवारांनी www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर जूनपर्यंत अर्ज करायचे आहेत.
बातम्या आणखी आहेत...