आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परीक्षा देऊन घरी परतणारा उमाळ्याचा तरुण ठार, वाकाेद जवळ दुचाकीला चारचाकीची जबर धडक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - गाेसेगाव (सिल्लाेड) येथून परीक्षा देऊन घरी परतणाऱ्या तरुणांच्या दुचाकीला वाकाेदजवळ चारचाकीने जबर धडक दिली. या अपघातात उमाळा येथील तरुण जागीच ठार, तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास घडली. 
 

अक्षय युवराज पाटील (वय २२, रा. उमाळा) असे मृताचे नाव अाहे. तर पवन ज्ञानेश्वर पाटील (वय २०) हा जखमी झाला अाहे. सिल्लाेड तालुक्यातील गाेसेगाव येथील महाविद्यालयात अक्षयचा बी. ए. द्वितीय वर्षाचा पेपर होता. त्याच्यासोबत पवनदेखील दुचाकीने गेला हाेता. पेपर संपल्यानंतर दाेघेही उमाळा येथे घरी परतत हाेते.
 
दरम्यान, वाकाेद गावाजवळ ट्रकच्यामागे असलेल्या बसने अाेव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला; मात्र, बसने नियंत्रण मिळवले. परंतु, बसच्या मागे असलेल्या चारचाकीने अक्षय पवनच्या दुचाकीला जबर धडक दिली. 
 
यात दुचाकी चालवणाऱ्या अक्षयला गंभीर दुखापत झाली, तर पवनच्या पायाला गंभीर इजा झाल्याने दाेघांनाही जळगाव सामान्य रुग्णालयात रात्री १० वाजेच्या सुमारास हलवण्यात अाले. तेथे डाॅक्टरांनी अक्षयला मृत घाेषित केले. मात्र, पवनवर तातडीने उपचार सुरू केले अाहेत. मृत अक्षयचे वर्षभरापूर्वी लग्न झाले हाेते. त्याच्या पश्चात पत्नी, अाई, वडील लहान भाऊ असा परिवार अाहे. घटनेची माहिती कळताच उमाळा येथील ग्रामस्थांनी जिल्हा रुग्णालयात माेठी गर्दी केली हाेती. 
बातम्या आणखी आहेत...