आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शतकातील 11-12-13ला व्यतिपात योगाचा अडसर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - इंग्रजी महिन्याच्या कॅलेंडरमधील 11-12-13 (11 डिसेंबर 2013) हा दिवस कायम लक्षात राहणारा आणि शतकात एकदाच येणारा दिवस आहे; अशा दिवसांचा योग साधण्याचा अलीकडे ट्रेंड असून या दिवसांमध्ये लग्न सोहळा अन्य कार्य पार पाडले जातात. मात्र, या दिवशी व्यतिपात योग येत असल्याने 11-12-13 चा मुहूर्त साधण्यासाठी फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे.
गेल्या वर्षी 12-12-12 या दिवसाचे औचित्य साधून मोठय़ा संख्येने विवाह पार पडले होते. एवढेच नव्हेतर ‘त्या’ महिन्यात होणार्‍या प्रसूतीचाही या दिवशी योग साधला होता. या दिवसाची आठवण राहावी म्हणून अनेकांनी नवीन वस्तू आणि नवीन वास्तूची खरेदीदेखील केली होती. यंदाही 11-12-13 असा सहज लक्षात राहणारा योग येणार आहे. हा दिवस कायम आठवणीत राहावा, यासाठी विवाह सोहळा उरकण्याचा मानस व्यक्त केला जात आहे, परंतु विवाह अथवा कुठलेही शुभकार्य करण्यास हा दिवस अनुकूल नसल्याचे अनेक पुरोहितांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना स्पष्ट केले आहे.
व्यतिपात योग खडतर
उत्तरा भाद्रपदा नक्षत्र दुपारी 2 वाजून 7 मिनिटांपर्यंत आहे. यादिवशी व्यतिपात योग आल्याने कुठलेच शुभ कार्य या दिवशी करण्यास वज्र्य आहे. या तर्काला शास्त्राचा आधार आहे. प्रसाद धर्माधिकारी, पुरोहित
नक्षत्राप्रमाणे योगही असतात. व्यतिपात, अतिगंड, वैध्रती यासह आठ योग मंगलकार्यासाठी वज्र्य आहेत. यादिवशी शक्यतो कुठलेच कार्य करू नये, असे शास्त्र सांगते. येणार्‍यांना आम्ही हा सल्ला देतो. -अनंत भालेराव, पुरोहित
कार्यालये रिकामी
पंचांगानुसार 11 डिसेंबरला विवाह मुहूर्त नसल्यामुळे या दिवशी बहुतेक मंगल कार्यालये रिकामी आहेत. मात्र, उर्वरित महिनाभरातील दिवसांमध्ये जवळपास सर्व कार्यालयांच्या तारखा बुक असल्याचे कार्यालय व्यवस्थापकांकडून सांगण्यात आले. या मुळे ऐनवेळी तारीख काढून मंगल कार्यालय बुक करण्याची धावपळ होईल.