आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कडक बंदाेबस्त असूनही दाेन दिवसात ११ चाेऱ्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - शहरात २५ ते २६ जानेवारीदरम्यान तब्बल ११ ठिकाणी चाेऱ्या झाल्या. यात चाेरट्यांनी पिंप्राळ्यातून एक चारचाकी, सात ठिकाणांहून सुमारे लाख ३१ हजार २०० रुपयांचा एेवज लंपास केला तर तीन ठिकाणी त्यांची निराशा झाली. चाेरटे बीजे मार्केट परिरसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले अाहेत. यात चार चाेरटे चारचाकीतून अाल्याचे दिसत अाहे.
रस्ते विकासच्या काेनशिला समारंभासाठी २५ जानेवारीला केंद्रीय रस्ते, दळणवळण मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री एकनाथ खडसे जिल्ह्यात हाेते. तसेच महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याच्या २८ जानेवारीला हाेणाऱ्या अनावरणासाठी माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील शहरात अाहेत. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश पोलिस अधिकारी कर्मचारी शहरात बंदाेबस्तासाठी दाखल झाले अाहे. तसेच सध्या रात्रीच्या गस्ती देखील कडक करण्याचे वरिष्ठाचे अादेश अाहे. तरी देखील चोरट्यांनी शहरातील २५ आणि २६ जानेवारीच्या रात्री शहरात ११ ठिकाणी चाेऱ्या झाल्या. त्यामुळे नागरिकांमध्ये अाश्चर्य व्यक्त केले जात अाहे.

महामार्गालगत रिलायन्स पेट्राेल पंपाजवळ अस्लम शेख (रा.अक्सानगर) यांचे स्टार बॅटरी सेल्स दुकान अाहे. मंगळवारी पहाटे चाेरट्यांनी दुकानाचे शटर उचकावून अात प्रवेश केला. शेख यांनी २५ जानेवारीला वसुलीचे ८५ हजार अाणले हाेते. मात्र, बँकेत जाण्यास उशीर झाल्याने त्यांना ते भरता अाले नाहीत; त्यामुळे त्यांनी ते पैसे दुकानातील तिजाेरीत ठेवले. चाेरट्यांनी तेच लंपास केले.

शेख यांच्या दुकानात चाेरी केल्यानंतर चाेरट्यांनी वसीम हसन बागवान यांच्या महाराष्ट्र रेफ्रिजरेटर दुकाने शटर ताेडून अात प्रवेश केला. मात्र, दुकानात राेख रक्कम नसल्याने चाेरट्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले.

जयकिसन वाडीतील विश्वास दीक्षित यांच्या अंतरिक्ष भवन या इलेक्ट्राॅनिक्स वस्तूंच्या दुकानाच्या शटरचे चाेरट्यांनी मंगळवारी पहाटे वाजता कुलूप ताेडले. मात्र, अातून कुलूप असल्याने ते त्यांना उघडता अाले नाही. त्यामुळे चाेरट्यांनी बाजूच्या गल्लीत असलेले शटरचे कुलूप ताेडले. या वेळी अावाज अाल्याने बाजूच्या घरातील वृद्ध महिला जागी झाली. त्यांनी दिवा लावलाल्यानंतर चाेरट्यांनी धूम ठाेकली. चाेरी करण्यासाठी तीन चाेरटे दुकानाजवळ अाले हाेते. त्यांनी साेबत ट्रकही अाणल्याचे वृद्ध महिलेने दीक्षित यांना सांगितले.

खंडेराव नगरात मंगळवारी रात्री ते १.३० वाजता सुरयाबी शकील पिंजारी (वय ३८) यांच्या घराचा कडी-काेयंडा ताेडून चाेरट्यांनी अात प्रवेश केला. या वेळी त्यांनी कपाटाचे लाॅक ताेडून लाॅकरमध्ये ठेवलेले १० हजार रुपये राेख लंपास केले.

पिंप्राळ्यातील प्रशांत चाैकात रमेश विष्णू क्षीरसागर यांच्या घरासमाेर त्यांची चारचाकी (क्र. एमएच- १९, क्यू- ८८८३) लावलेली हाेती. मंगळवारी रात्री ते बुधवारी पहाटे वाजेदरम्यान अज्ञात चाेरट्यांनी गाडी चाेरून नेली. या प्रकरणी क्षीरसागर यांनी रामानंदनगर पाेलिस ठाण्यात तक्रार दिली अाहे.