आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावात 11 हजार क्विंटल तूर पडून; नाफेडने नाकारलेली तूर व्यापाऱ्यांकडे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- शासनाने तूर खरेदी करणे बंद केल्यामुळे नाफेडच्या जिल्ह्यातील तीन केंद्रांवर ११ हजार क्विंटल तूर खरेदीअभावी पडून आहे. व्यापाऱ्यांनीही तुरीचे भाव पाडल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला अाहे. नाईलाजाने शेतकऱ्यांना ३५०० ते ४००० हजार रूपये क्विंटल अशा कमी दराने तूर विक्री करावी लागत आहे. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले असून खरेदी केंद्र पुन्हा सुरू करण्याची मागणी होत आहे. 
 
एफसीआयतर्फे जळगाव खरेदी केंद्रावर तूर खरेदी करण्यात आली. तर  जळगावसह चोपडा, अमळनेर, बोदवड, रावेर, मुक्ताईनगर, चाळीसगाव व पाचोरा या नाफेडच्या आठ केंद्रांवरही  तूर खरेदी करण्यात आली. एफसीआयतर्फे जानेवारीपासून तूर खरेदी करण्यात येत होती. २३ एप्रिलपर्यंत तूर खरेदी करण्याचे शासनाने जाहीर केले होते. जिल्ह्यात बारदानाअभावी अनेकदा या खरेदी केंद्रांवरील तूर खरेदी बंद होती.  त्यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला होता. 
नाफेच्या केंद्रावर २३ एप्रिल रोजी तूर खरेदी करण्याचा शेवटचा दिवस असल्याने शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर गर्दी केली होती. रात्री ९ वाजेपर्यंत केंद्रावर तूर खरेदी व मोजमाप करण्यात आले. एफसीआयतर्फे ३ हजार ७७१ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. तर सद्यस्थितीत जिल्ह्यात जामनेर येथे २ हजार ६०० क्विंटल, बोदवड येथे २ हजार क्विंटल आणि मुक्ताईनगर येथे ६५०० क्विंटल तूर खरेदीअभावी नाफेडच्या केंद्रावर पडून आहे.
 
नाफेडने नाकारलेली तूर व्यापाऱ्यांकडे
तूर विक्रीसाठी नाफेड खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांना रांगा लावाव्या लागल्या.  या वेळी तूर खरेदी करताना शुद्धता, आर्द्रता बघून चाळणी करण्यात आली. त्यामुळे नाफेडच्या निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्यात आली नाही. तूर खरेदीस नकार दिल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना कमी भावामध्ये व्यापाऱ्यांना तूर विकावी लागली. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. या केंद्रांवर व्यापाऱ्यांची तूर मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. 
बातम्या आणखी आहेत...