आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन रेल्वे उड्डाण पुलांसाठी ११६ काेटी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - शहरातील राष्ट्रीय महामार्गावर तीन उड्डाणपूल, रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यासाठी ४०० काेटी रुपयांचा निधी मंजूर केला अाहे. अाता शिवाजीनगर, पिंप्राळा रेल्वेगेट अाणि दूध फेडरेशन येथील रेल्वे उड्डाणपुलासाठी ११६ काेटी रुपयांचा निधी मंजूर करीत असल्याची घाेषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली.
जिल्ह्यात रस्ते विकासाच्या कामांचा शुभारंभ कार्यक्रम साेमवारी सागर पार्कवर झाला. या वेळी केंद्रीय मंत्री गडकरी यांनी महापालिकेकडे निधी नसल्याने अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या शिवाजीनगर रेल्वे उड्डाण पुलांसाठी २५ काेटी, पिंप्राळा रेल्वेगेट पुलासाठी ८० काेटी अाणि दूध फेडरेशनजवळील सुरत रेल्वेलाइनवरील पुलासाठी ११ काेटींचा निधी मंजूर करण्यात अाल्याची घाेषणा केली. तसेच शहरातील तीन उड्डाण पुलांसाठी यापूर्वीच ४०० काेटी मंजूर केले अाहेत. मी शुभारंभ करीत असलेली सर्व कामे हाेतील, मनात शंका बाळगू नका, टेंडर नाही, मंजुरी नाही, एवढा निधी काेठून अाणणार? अशा शंका घेऊ नका. मी घाेषणा केलेल्या प्रत्येक कामाला डिसेंबरपूर्वीच प्रारंभ झालेला असेल. पैसा नव्हे तर

राजकीय इच्छाशक्तीच्या बळावर ही कामे वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार अाहे. रस्ते विकासातून वर्षांत देशाचा जीडीपी टक्क्याने वाढवू अाणि लाख लाेकांना राेजगार देऊ, असे उद्दिष्ट ठेवले अाहे. महाराष्ट्रात लाख काेटी रुपयांचे रस्ते बांधणार अाहाेत, असेही गडकरी यांनी सांगितले. व्यासपीठावर खासदार रक्षा खडसे, ए.टी.पाटील, डाॅ.सुभाष भामरे, अामदार हरिभाऊ जावळे, गुलाबराव पाटील, संजय सावकारे, किशाेर पाटील, चंद्रकांत साेनवणे, उन्मेष पाटील, शिरीष चाैधरी, सुरेश भाेळे, चैनसुख संचेती, डाॅ.संजय कुटे, गुरुमुख जगवाणी, स्मिता वाघ, जिल्हा परिषद अध्यक्षा प्रयाग काेळी, महापाैर राखी साेनवणे, दूध संघाच्या अध्यक्षा मंदाकिनी खडसे, जिल्हा बँकेच्या अध्यक्षा अॅड.राेहिणी खडसे-खेवलकर, माजी खासदार एम. के. पाटील, गुणवंतराव सराेदे, डाॅ. राजेंद्र फडके, जिल्हाध्यक्ष उदय वाघ उपस्थित हाेते.

१०० टक्के इथेनाॅलचा वापर
कृषीप्रक्रिया उद्याेगांना चालना देण्यासाठी १०० टक्के इथेनाॅलवर चालणाऱ्या वाहनांना परवानगी देण्याचा निर्णय याच अाठवड्यात घेतला जाणार अाहे. इथेनाॅलपासून बायाे प्लास्टिक तयार करण्याचा प्रयाेग अाम्ही विदर्भात करीत अाहाेत. मक्याच्या कणसाचे वेस्ट, पऱ्हाटी, तुऱ्हाटीपासून इथॅनाॅल इथेनाॅलपासून प्लास्टिक तयार करण्यासंदर्भात प्रयाेग सुरू अाहे. देशात लाख काेटी लिटर्स इंधन लागते. इथेनाॅलचा इंधन म्हणून वापरामुळे अायात केले जाणारे इंधन वाचू शकणार अाहे. तसेच युरियाच्या किमती ५० टक्क्याने कमी करण्यासाठी काेळशाच्या खाणीमध्ये युरिया तयार करण्याचे तंत्र विकसित केले जात अाहे.

अपघात स्थळांसाठी निधी
देशात४८ लाख किलाेमीटरचे रस्ते अाहेत. दरवर्षी लाख अपघात हाेतात. यातील लाख लाेकांना अपंगत्व येते तर दीड लाख लाेकांना प्राण गमवावे लागतात. माझे कुटुंबदेखील अशाच अपघातातून बचावले अाहे. रस्त्यावरील अपघात स्थळांचा अभ्यास करून ७२६ राष्ट्रीय महामार्गांवरील अपघात स्थळे दुरुस्त करण्यासाठी ११ हजार काेटी खर्च करून अपघातांचे प्रमाण कमी केले जाणार अाहे. ९६ लाख किलाेमीटरचा महामार्ग अाता दीड लाख किलाेमीटरचा करण्यास मंजुरी देण्यात अाली अाहे. याच अाठवड्यात एकाच वेळी तब्बल २५० रेल्वेब्रीजचे काम सुरू केले जाणार अाहे. दिल्ली ते मेरठ हा तासांचा रस्ता अाता केवळ ४० मिनिटात पूर्ण हाेईल, यासाठी १४ लेनचा काँक्रिट राेड तयार केला जात अाहे. दिल्ली ते वैष्णवदेवीपर्यंतचा एक्स्प्रेस हायवे तयार केला जात अाहे. यात तासांत प्रवास पूर्ण हाेईल.

जिल्ह्यात वेस्ट बँक
प्रत्येक जिल्ह्यात बचत गटांच्या माध्यमातून वेस्ट बँक स्थापन करण्यात यावी. शासन बचत गटांकडून ३५ रुपये किलाेप्रमाणे प्लास्टिक विकत घेईल. महागड्या डांबरापेक्षा रस्ते बनविण्यासाठी या प्लास्टिकचा वापर अधिक याेग्य राहील.

हवेतील रस्ता
दिल्लीमध्ये सध्या तंत्रज्ञानाचा वापर करून हवेत चालणारा ७० किमीचा रस्ता तयार केला जात अाहे. देशात इतर ठिकाणीही अशी यंत्रणा वापरली जाईल. जिल्ह्यात पुढच्या दाैऱ्यात माझे विमान एखाद्या नदी किंवा धरणावर उतरविन, असेही गडकरी म्हणाले.

शेतकरी, कार्यकर्त्यांचा गाेंधळ
मंत्र्यांकडून कापूस, केळीच्या भावाबाबत घाेषणा व्हावी, अशी प्रतीक्षा असलेल्या शेतकऱ्यांनी गिरीश महाजनांचे भाषण मध्येच थांबवून कापूस अाणि केळीच्या भावाबाबत बाेलण्याचा अाग्रह केला. त्यावर महाजन यांनी शेतकऱ्यांची चिंता खरी अाहे. शेतमालाला भाव नाही. परंतु त्याचे उत्पादन वाढविण्यासाठी पाणी उपलब्ध करून देईल असे सांगितले.

जळगावसाठी ड्रायपाेर्ट
विकासाला चालना देण्यासाठी जालना येथे माेठे ड्रायपाेर्ट उभारण्याचे काम सुरू अाहे. जळगाव जिल्ह्यातील विकासाला, उद्याेगांना चालना देण्यासाठी ड्रायपाेर्ट मंजूर करण्याची तयारी अाहे. महामार्ग अाणि रेल्वे यांच्यादरम्यान माेठी जागा असल्यास सुचवा तेथे तातडीने ड्रायपाेर्टला मंजुरी देण्यात येईल.

नितीन गडकरी विमानतळावरून थेट अामदार गुरुमुख जगवाणी यांच्या निवासस्थानी गेले होते. तेथे भाेजनादरम्यान गडकरींनी पाणीपुरीचा आस्वाद घेतला. या वेळी त्यांना जळगावची पाणीपुरी भावली. दुपारी वाजता ते कार्यक्रमस्थळी पाेहाेचले. कार्यक्रम अाटाेपल्यानंतर ते दुपारी ३.४५ वाजता कार्यक्रम स्थळाशेजारी असलेल्या विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या निवासस्थानी गेले. तेथे त्यांनी अॅड.निकम यांच्याशी १० मिनिटे चर्चा केली.

स्वच्छता अभियानाला हरताळ
सभेदरम्यान मान्यवरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाची कार्यकर्त्यांना जाणीव करून दिली. तसेच जेवणाचे पाकिट पाण्याचे पाऊच इतरत्र फेकता कचराकुंडीत टाकण्याचे आवाहन केले होते. तरी देखील सागर पार्क मैदान, महाबळ रस्ता, िसंधी कॉलनी, मणियार कॉलेज मैदानावर जेवणाची पाकिटे पाणी पाऊच रस्त्यावर फेकलेले होते.

जलसंपदा विभागासाठी ५० हजार काेटी द्या
जलसंपदा खाते तुमचे नसले तरी तुमच्यात क्षमता अाहे. तुम्ही माझ्या खात्यासाठी ५० हजार काेटी दिले तर प्रकल्पाची कामे होतील. वीज पाणी मिळाले तर शेतकऱ्यांना फायदा होईल, असे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.

कार्यक्रमात १६ हजार ५८२ काेटींच्या विकासकामांचे भूमिपूजन झाले. केवळ दाेन बैठकांमध्ये हा निधी मिळाला. तिसरी बैठक अाज व्यासपीठावरच झाली. त्यातही नितीन गडकरी यांनी शहरातील तीन रेल्वेपुलांसह अाणखी हजार काेटींच्या कामांना मान्यता दिली. त्यामुळे हा निधी अाता १८ हजार काेटींवर गेला अाहे. ड्रायपाेर्ट, जलवाहतूक यासारख्या विषयांना त्यांनी मंजुरी दिली अाहे. शहरातील महामार्गाला अॅप्राेच असलेेले रस्तेही २०० मीटरपर्यंत बनविले जाणार अाहेत. वर्षभरात एकाही धरणाचे काम मार्गी लागले नाही. परंतु अाता विप्राेचे अजीम प्रेमजींकडे प्रयत्न सुरू अाहेत. त्यांच्याकडून ते हजार काेटी मिळाले तर पाडळसे धरण पूर्ण हाेईल. -एकनाथ खडसे,पालकमंत्री.

दोन हजार काेटींच्या वाढीव कामांना मंजुरी
रस्ते वाहतुकीचा खर्च दीड रुपये, रेल्वे वाहतुकीचा एक रुपया तर जलवाहतुकीचा खर्च २० ते २५ पैशांपर्यंतच असल्याने इंधन बचतीसाठी जलवाहतुकीचा वापर वाढविणे अावश्यक अाहे. जलवाहतुकीसाठी नद्यांचा वापर करताना या नद्यांमधील वाळू रस्ते बनवण्यासाठी माेफत द्यावी, अावश्यक तेवढा वाळू उपसा करून रस्ते बांधणे, नद्यांचे खाेलीकरण करून पाणी अडवणे, जलवाहतूक सुरू करण्याचे काम करण्यात येईल. उर्वरित वाळू महसूल विभागाने लिलावात विक्री करावी, असा प्रस्ताव गडकरी यांनी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या पुढे ठेवला. जळगाव जिल्ह्यात तापी, पूर्णा, गिरणा, अंजनी अाणि वाघूर या नद्यांवर जलवाहतूक करण्याची घाेषणा त्यांनी केली.

तापी, पूर्णा, गिरणा, अंजनी नद्यांवर जलवाहतूक
पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त करीन : खडसे
माझ्या १५ दिवसांच्या गैरहजेरीत काहींनी काेल्हेकुई केली. धिंगाणा घातला, बँकेवर चाल केली. दाेन- चार कुत्री पिसाळलेली अाहे. परंतु गिरीशभाऊ मी पशुसंवर्धन खात्याचाही मंत्री अाहे. त्या कुत्र्यांचा बंदाेबस्त करीन.

बरेझाले शेतकऱ्यांनी गिरीश महाजनांना कापसाच्या भावाबाबत विचारले. कारण त्यांनीच त्या काळात पुढाकार घेतला हाेता. मी उत्पादन खर्च कमी करण्याचा प्रयत्न करताेय.
मी१०० कामे सांगेल जी मी केली, विराेधकांनी एक तरी काम सांगावे. विराेधकांनी स्पर्धा विकासाची करावी.