आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 11th 12th Class Model Question Paper Not Provided In Future

आता मिळणार नाही 11वी, 12वीच्या नमुना प्रश्नपत्रिका

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - विद्यार्थ्यांनी अभ्यासातील मूळ संकल्पना लक्षात घेऊनच परीक्षेची तयारी करावी यासाठी या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांना नमुना प्रश्नपत्रिका न देण्याचा निर्णय सीबीएसई बोर्डाने घेतला आहे. विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळत असले तरी अभ्यासातील मूळ संकल्पना त्यांना प्रात्यक्षिकदृष्ट्या सांगता येत नसल्याचे बोर्डाने स्पष्ट केले आहे.

सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन एकीकडे परीक्षा पद्धती अधिक सोपी व्हावी यासाठी प्रयत्न करीत आहे तर दुसरीकडे नमुना प्रश्नपत्रिका न देऊन विद्यार्थ्यांची समस्या वाढवित असल्याचे मत शिक्षकांनी व्यक्त केले आहे. गेल्या 20 वर्षांपासून बोर्ड अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी नमुना प्रश्नपत्रिका देते. मात्र, त्यामुळे 90 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या वाढत असली तरी मूळ संकल्पना स्पष्ट होत नसल्याचे बोर्डाचे मत आहे. विद्यार्थ्यांनी सखोल अभ्यास करावा, यासाठी आता ही पद्धत बंद करण्यात येत आहे. याबाबत शिक्षकांनी मात्र नाराजी व्यक्त केली असून याऐवजी अभ्यासक्रमात वेगळी उपाययोजना करावी, असे मत मांडले आहे. शिक्षकांच्या मते नमुना प्रश्नपत्रिकेमुळे विद्यार्थ्यांची चांगली तयारी होते.

सखोल अभ्यासाची गरज
2013 मध्ये 44 हजार 676 विद्यार्थ्यांनी 90 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवलेले आहे तर पाच वर्षांपूर्वी हा आकडा 15 हजार 839 पर्यंत होता, अशी माहिती सीबीएसईच्या बैठकीत समोर आली. विद्यार्थी जुन्या प्रश्नपत्रिका सोडवून प्रश्नांचा अंदाज घेतात आणि तेवढाच अभ्यास करतात, असे बोर्डाचे मत झाले. त्यामुळे नमुना प्रश्नपत्रिका बंद केल्यास विद्यार्थ्यांना सखोल अभ्यास करावा लागेल.