आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बारा मैत्रिणींची 20 वर्षांच्या मैत्रीची धमाल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- संसार-प्रपंच सांभाळून गेल्या 20 वर्षांपासून 12 मैत्रिणींचा ग्रुप आपली निकोप मैत्री सांभाळून आहे. मैत्री केवळ त्यांच्यापुरतीच र्मयादित न ठेवता त्यांनी आपले कुटुंबदेखील मैत्रीशी जोडल्याने ‘फ्रे ण्डशिप डे’ हा ग्रुप एखाद्या सणासारखा साजरा करतो.
जळगावात राहणार्‍या अलका लढ्ढा, मधू झंवर, विद्या तोतला, तृप्ती काबरा, मनीषा झंवर, माया दोशी, मितू दोशी, कविता अग्रवाल, कविता मालू, पूजा ठाकूर, अर्चना चौधरी, सुलभा लढ्ढा या मैत्रिणी ‘फ्रेण्डशिप डे’ निमित्त दरवर्षी एका मैत्रिणीच्या घरी एकत्र येऊन ‘फ्रेण्डशिप डे’ साजरा करतो, मैत्रीचे नाते जपत वर्षातून एकदा सहलही या ग्रुपची ठरलेली असते. अशा आगळ्या मैत्रिणींच्या ग्रुपने रविवारी देखील ‘फ्रेण्डशिप डे’ साजरा केला.