आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खासगी क्लासमध्ये बेंचवर उभे केल्याने 12thच्या विद्यार्थिनीची आत्महत्या; धुळ्यातील घटना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे- खासगी क्लासमध्ये उशिरा आल्यामुळे शिक्षकाने बेंचवर उभे करून अपमान केला. हा अपमान सहन झाला नाही म्हणून बारावी सायन्सचे शिक्षण घेणाऱ्या महाविद्यालयीन युवतीने गळफास लावून आत्महत्या केली.

 

उन्नती संजय महाले (वय- 17) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. ती जयहिंद सीनिअर कॉलेजमध्ये शिकत होती. याप्रकरणी दोषी शिक्षकाला अटक करण्याची मागणी विद्यार्थिनीच्या नातेवाइकांनी केली.

 

उन्नती ही देवपूर दत्त मंदिर परिसरातील संकल्प क्लासेसमध्ये सोमवारी सकाळी उशिरा पोहोचली. त्यामुळे तीला शिक्षकाने तिला बेंचवर तासभर उभे केले. तो अपमान सहन झाल्यामुळे तिने रूमवर येऊन आत्महत्या केली. याबाबत तिची मैत्रीण आकांक्षा गाेकूळ भदाणे हिने दिलेल्या माहितीवरून पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मात्र, सायंकाळी नातेवाइकांनी पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन जोपर्यंत दोषी शिक्षकाला अटक करीत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका घेतली. रात्री उशिरापर्यंत पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात संबंधित शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. निजामपूर येथील आदर्श कॉलेजमध्ये प्राध्यापक असलेले संजय वसंत महाले यांची उन्नती ही मुलगी होती. तिला दहावीत चांगले गुण मिळाल्याने तिने पुढील शिक्षणासाठी जयहिंद सीनिअर कॉलेजमध्ये अॅडमिशन घेतले होते.  

 

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा... उन्नतीला डायरीत नोंद करायची होती सवय

 

बातम्या आणखी आहेत...