आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावात उभारली १३ फूट उंच भारतमातेची मूर्ती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- ‘भारतमाता की जय’ म्हणताच प्रत्येक भारतीयाचे राष्ट्रभक्तीचे स्फुलिंग जागृत होते. भारतमातेचा फोटो किंवा मूर्ती पाहिल्यावर विचारायलाच नको. जाज्वल्य राष्ट्रप्रेम जागृत करणारी स्फूर्तिदायक,अत्यंत मनमोहक, आखीव, रेखीव बघतच राहावी अशी १३ फूट उंचीची भव्य भारतमातेची मूर्ती शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या कुसुंबाच्या आर.सी.बाफना गोसेवा अनुसंधान केंद्रात आर.सी.बाफना ज्वेलर्सचे संचालक रतनलाल बाफना यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आली आहे.
कोण आहेत राजेश पटनायक?

सुंदरगडजिल्ह्यातील महेशडिही या गावातील राजेश पटनायक रहिवासी आ. ते मूर्ती निर्माणसाठी भारतभर फिरत आहेत. गेल्या वर्षांपासून ते महाराष्ट्रात आहेत. कोटा ये‌थे ‘घटोत्कच कर्ण यांच्यातील युद्धाच्या प्रसंगाचे भव्य शिल्प त्यांनी उभारले आहे.

‘भास्कर्य कला’ शैलीतील मूर्ती
ओडिसीमूर्तिकार राजेश पटनायक यांनी जळगावातील बजरंग परदेशी, चंद्रकांत सुरवाडे हे दोन प्रशिक्षणार्थी शिल्पकार सुरेश सुरवाडे या वेल्डरच्या सहकार्याने ही ‘भास्कर्य कला’ शैलीतील मूर्ती बनवली आहे. स्टीलचा सांगाडा, सिमेंट, मार्बल पावडर यांच्या मिश्रणापासून सहा महिन्यांत मूर्ती साकारली.

असे आहे वर्णन..
मूर्तिकारानेअगोदर लोखंडाचा सांगाडा तयार करून त्यात आरसीसी स्ट्रक्चर उभारण्यात आले आहे. यात पांढरे सिमेंट मार्बल पावडरची पेस्ट करून रेखीव मूर्ती तयार केली आहे. भारतमातेने पांढरे शुभ्र वस्त्र परिधान केले आ. डोक्यावर मुकुट असून हाती डाैलाने फडकणारा तिरंगा आ.
देशात भारतमातेची सर्वात मोठी मूर्ती पुद्दुचेरीमध्ये

देशातीलसर्वात मोठी भारतमातेची मूर्ती पुद्दुचेरीच्या यानम जिल्ह्यात गोतमी नदीच्या किनाऱ्यावर असून, सुमारे ३६ फूट उंचीची ब्राँझची ही मूर्ती आहे. मूर्तीचे ११ टन वजन, सिंह १५ फूट उंच तर १३ फूट उंचीचा चोथरा आहे.
०६ फुटांचाचौथरा
१३
फूटमूर्तीची उंची
१२
फूटरुंद सिंह
६००
किलोलोखंड
३३.५
फूटउंचीचा डोम
बातम्या आणखी आहेत...