आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘स्मार्ट सिटी’साठी १३ मुद्दे!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांची भेट घेतल्यानंतर मुद्यांवर चर्चा करताना महापौर जयश्री अहिरराव.
धुळे- नगररचनेत देशभरात दुसरा क्रमांक असलेल्या धुळे शहराला स्मार्ट होण्यासाठी तब्बल १३ महत्त्वाच्या मुद्यांवर झुंज द्यावी लागणार आहे. महापौर जयश्री अहिरराव यांनी या १३ मुद्यांवर महापालिका यापुढे लक्ष देईल, असे सांगितले. प्रत्यक्षात कठाेर प्रयत्न करावे लागणार अाहेत. ‘स्मार्ट सिटी’साठी असलेल्या ५८ अटींपैकी १० अटी शहरात पूर्ण हाेऊ शकतात. म्हणजेच, जवळपास ४८ अटी पूर्ण करता येणे अशक्य अाहे. सध्या निधीअभावी प्राथमिक सुविधा देणेही महापालिकेला कठीण झाले अाहे. तसेच पाण्याची समस्याही नीटपणे साेडवता येत नाही. शहरात केंद्राची पाणी याेजना हा एकमेव माेठा प्राेजेक्ट अाहे. मात्र, त्यावरून हाेणारे अाराेप-प्रत्याराेपही थांबायला तयार नाहीत. स्मार्ट सिटीच्या मार्गात अडथळे अाणणाऱ्यांची संख्याही माेठी अाहे. दिल्ली-मुंबई काॅरिडाॅरमधून शहराचे चित्र काही प्रमाणात बदलेल. मात्र, त्यासाठी जवळपास १० वर्षांच्या कालावधीची वाट पाहावी लागणार अाहे.

धुळे शहराला स्मार्ट सिटीच्या दिशेने जाण्याचे वेध लागले अाहेत. मुळात हे शहर कधीच स्मार्ट सिटी झाले असते. तेव्हा शहराची लाेकसंख्याही कमी हाेती. त्याचबराेबर नगररचनेत जयपूरनंतर धुळे शहराचा क्रमांक लागत हाेता; परंतु शहराला केंद्रच नव्हे, तर राज्यस्तरावरही नीटपणे प्रेझेंट करणारे नेतृत्व कधी मिळालेच नाही. त्यामुळे अाता पंतप्रधानांनी स्मार्ट सिटीसाठी ज्या ५८ अटी ठेवल्या अाहेत त्यातील १० अटीही शहरात पूर्ण हाेऊ शकणार नाहीत अशी स्थिती अाहे. प्रशासनालाही याची जाण अाहे. महापालिकेकडे काेणताही निधी नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर हाेत नाहीत की ठेकेदारांची देणी दिली जात नाहीत. त्यामुळे अगदी जीवनमरणाशी संबंधित असलेल्या अाैषधांचे टेंडरही काेणी भरत नाही. गटारी रस्त्यांवरच सर्वाधिक निधी खर्च केला जाताे. नागरिकांच्या मनात भरण्यासारखा एकही माेठा प्रकल्प नाही. तसेच अद्यापही चार माेठ्या भागांमध्ये भारनियमन केले जात अाहे.

कुठलाही प्रकल्प पूर्ण नाही
सध्याशहरात काेणताही माेठा प्रकल्प नाही. केंद्र सरकारने दिलेली पाणी याेजना तेवढी अाहे. ही याेजना साेडली तर महत्त्वाचे प्रकल्प नसल्यामुळे महापालिका १० अटी तरी पूर्ण करू शकेल का? हा प्रश्न उरताेच. तुम्ही कुठले माेठे प्रकल्प पूर्ण केले, त्याचा नागरिकांना काय फायदा झाला, पर्यावरणीय परिणाम काय झाले अादी सगळ्या बाबींचा या अटींमध्ये समावेश अाहे; पण शहरात या सगळ्या अटी पूर्ण हाेतील, याची शक्यता कमीच अाहे. शहराच्या जवळपास २५० ते ५०० एकर जमिनीवर एखादा मोठा प्रकल्प हाती घेण्यासारखीही महापािलकेची स्थिती नाही.

पैसेच नाही तर स्मार्ट हाेणार कसे?
शहराचेनियमन करणाऱ्या महापालिकेकडे कुठल्याही याेजनेतील निधी सध्या तरी नाही. पुढील काळातही शासनाकडेच निधीसाठी हात पसरावे लागणार अाहेत. कुठल्या तरी याेजनेतून अालेल्या निधीतून केवळ वेतन इतर देणी दिली जातात. स्मार्ट हाेण्यासाठी पायाभूत सुविधांवर भर द्यावा लागताे. मात्र, पैशांअभावी शहरात पायाभूत सुविधाही देता येत नाहीत, ही सत्यता लपवता येणार नाही. त्यामुळे स्मार्ट सिटीच्या दिशेने पडणारे कुठलेही पाऊल मागे घेण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असे दिसते. नागरिकांना सुविधा देण्यात पैशांची उणीव भासते. त्यासाठी राज्य सरकारही सध्या मदत करताना दिसत नाही.

तेरा मुद्द्यांवरून ठरणार पात्रता...
‘स्मार्टसिटी’ याेजनेत समावेश हाेण्यासाठी एलईडी, घनकचरा व्यवस्थापन, ८० टक्क्यांपेक्षा अधिक करांची वसुली, नवीन एसएसअाय, संपूर्ण संगणकीकरण अादी तेरा मुद्यांवर प्रभावीपणे काम करावे लागणार अाहे. हे तेरा मुद्दे पूर्ण केल्यानंतरच अापल्या शहराचा स्मार्ट सिटी याेजनेत समावेश केला जाऊ शकताे, अशी माहिती महापाैर जयश्री अहिरराव यांनी दिली. त्यात करवाढीतून उत्पन्नवाढीसह पीपीपीसारखे अनेक प्राेजेक्ट राबवणे गरजेचे अाहे. घनकचऱ्यासह अनेक प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित अाहेत. याबाबत पाठपुरावा करावा लागणार असल्याचेही महापाैर अहिरराव यांनी सांगितले.

घानकचरा व्यवस्थापन महत्त्वाचे
दिल्लीयेथे झालेल्या कार्यक्रमात घनकचरा व्यवस्थापन कसे करावे, याबाबत हैदराबाद सुरत येथे करण्यात अालेल्या कामाची चित्रफीत दाखवण्यात अाली. शहरात भूमिगत गटारींची याेजना केंद्राकडून प्रस्तावित अाहे. ती झाल्यास घनकचऱ्याची समस्या सुटण्यास माेठा हातभार लागणार असून, महत्त्वाची अट पूर्ण हाेणार अाहे. याबाबत व्यंकय्या नायडू यांच्याकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे महापाैर जयश्री अहिरराव यांनी "दिव्य मराठी'शी बोलताना सांगितले. शहरातून मोठ्या प्रमाणात घनकचरा निघतो. त्यावर प्रक्रिया केली जाते; परंतु त्यापासून निर्माण झालेले खत कुणीही घेत नाही.
करांचे वाढेल अाेझे
महापालिकेनेपाणीपट्टीवाढीचा प्रस्ताव अाणला अाहे. त्यानुसार तिप्पट पाणीपट‌्टी वाढू शकते. त्यात ‘स्मार्ट सिटी’चा विचार केल्यास सगळ्याच करांमध्ये वाढ हाेईल. मालमत्ता करात मध्यंतरी वाढ करण्याचा प्रस्ताव महापालिकेने ठेवला. या सगळ्या करांमध्ये वाढ झाल्यास त्याचे ओझे नागरिकांवरच पडणार असल्याची जाणीवही मनपाला ठेवावी लागणार अाहे.
बातम्या आणखी आहेत...