आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हज यात्रा: 33 हजार ऐवजी फक्त 13 हजारच भाविकांचा ग्रीन कॅटेगरीत समावेश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ- सौदी अरबमधील हज यात्रेसाठी यंदा जगभरातून १७ लाख तर भारतातून १ लाख ७० हजार मुस्लिम भाविक सहभागी झाले आहेत. त्यापैकी ग्रीन कॅटेगिरी अर्थात ‘अ’ वर्ग श्रेणीत ३३ हजार भाविकांचा समावेश केला जाणार होता, मात्र केवळ १३ हजार ५०० भाविकांना ही संधी मिळाली तर उर्वरित १९ हजार ५०० भाविकांना ‘ब’ वर्ग अजिवीया कॅटेगिरीत वर्ग करण्यात आले. त्यामुळे त्यांना पवित्र हरम शरिफपासून तब्बल साडेआठ किमी अंतरावर निवास उपलब्ध झाला आहे.  

हजयात्रा २०१७ साठी यंदा सौदी अरबमध्ये जगभरातून तब्बल १७ लाख भाविक दाखल झाले आहेत. यात देशभरातील १ लाख ७० हजार मुस्लिम भाविकांचा समावेश आहे. यंदाच्या हजयात्रेसाठी सर्वाधिक २ लाख २६ हजार भाविक इंडोनेशिया या देशातून आले अाहे, अशी माहिती सौदी अरबमधील विदेश मंत्रालयातील सुत्रांनी माहिती दिली. देशभरातून १ लाख २५ हजार भाविक हज कमेटीतर्फे तर ४५ हजार भाविक स्वतंत्र टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून हज यात्रेसाठी पोहोचले आहेत. यापैकी ३३ हजार भाविकांचा महत्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या ग्रीन कॅटेगरी अर्थात ‘अ’ वर्ग श्रेणीत समावेश झाला होता.

 यात सामाविष्ट भाविकांना पवित्र हरम शरिफजवळ राहण्याची संधी मिळते. मात्र यंदा तेथील इमारतीचे बांधकाम सुरु असल्याने ३३ हजारांपैकी केवळ १३ हजार ५०० भाविकांनाच ‘अ’ वर्ग ग्रीन कॅटेगिरीमध्ये स्थान मिळाले, अशी माहिती हज संबंधी सूत्रांनी दिली.

१०४ वर्षीय महिलेची यात्रा
इंडोनेशिया देशातून १०४ वर्ष वयाच्या सर्वात वयोवृद्ध महिला मारिया मर्जिनी मोहम्मद यंदाच्या हजयात्रेसाठी आल्या आहेत. हज मीडियाचे डायरेक्टर अ. खालीक यांनी त्यांचे तेथील विमानतळावर जाऊन स्वागत केले, अशी माहिती तेथील विदेश मंत्रालयातील सूत्रांनी दिली.

परतावा मिळणार 
पवित्र हरमशरिफ जवळ यंदा इमारतींचे बांधकाम सुरू आहे. यामुळे हज कमेटीतर्फे मिळालेल्या भारतातील कोट्यामध्ये समाविष्ट असलेल्या ३३ हजार भाविकांपैकी ग्रीन कॅटेरिपासून वंचीत राहिलेल्या १९ हजार ५०० भाविकांना ब वर्ग कॅटेगिरीत समाविष्ट करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...