आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थांब्यापासून पुढे एसटी उभी केल्याने 13 वर्षीय विद्यार्थ्याने फोडली काच, महिला वाहकाला शिवीगाळ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - शाळेत जाण्यासाठी थांब्यावर उभे असताना एसटी बस काही अंतर पुढे गेल्यानंतर थांबली. याचा राग आल्यामुळे एका १३ वर्षीय शाळकरी मुलाने दगड मारून बसच्या मागील काच फोडून महिला वाहकाला शिवीगाळ केल्याची घटना सोमवारी दुपारी मोहाडी फाट्याजवळ घडली. 
 
धानोरा येथून जळगावाला सोमवारी दुपारी १२ वाजता एसटी (एमएच २०, डी ८७१८) मोहाडी रोड परिसरातून येत होती. खलील खान हे बस चालवत होते. एस. पी. बिऱ्हाडे या महिला वाहकाने सुरूवातीला बस थांबवण्याची सिंगल बेल दिली. त्यानंतर एका प्रवाशाने लागलीच डबल बेल दिल्यामुळे चालक खान यांनी बस पुढे नेण्यास सुरूवात केली. या वेळी थांब्यावर उभ्या असलेल्या काही मुलांनी आरोळी देऊन पुन्हा बस थांबवली. बस थोडे अंतर पुढे गेल्यामुळे थांब्यावर उभ्या असलेल्या एका विद्यार्थ्याला त्याचा राग आला. त्याने दगड मारून बसची काच फोडली. वाहक बिऱ्हाडे यांनी त्या मुलाला रागावण्याचा प्रयत्न केला असता त्याने थेट शिवीगाळ केली. खांद्यावरील स्कूल बॅग फेकून देत तो बिऱ्हाडे खान यांना मारहाण करण्याच्या तयारीत होता. प्रवासी नागरिकांनी त्या मुलाला शांत केले. 
 
बस पोलिस ठाण्यात : वाद मिटल्यानंतर बस स्थानकात नेण्यात आली. परंतु, सरकारी मालमत्तेचे नुकसान झाल्यामुळे घडलेल्या प्रकाराची नोंद करण्यासाठी नंतर बस एमआयडीसी पोलिस ठाण्यात घेऊन जाण्यात आली. या संदर्भात बिऱ्हाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ‘त्या’ मुला विरूद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल केला अाहे. तर या मुलाच्या पालकांनी बस स्थानकात जाऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली. 
बातम्या आणखी आहेत...