आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तेरा वर्षीय अादित्यच्या अॅपमधून मिळेल पाणीपुरवठ्याची माहिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - अापल्या प्रभागात पाणी केव्हा येईल, याची चिंता करीत पाण्याची वाट पाहण्याची वेळ नागरिकांवर येते. मात्र, अाता अॅपच्या माध्यमातून प्रभागात पाणी केव्हा येईल, त्याची स्थिती काय असेल याची माहिती मिळणे सुलभ हाेणार अाहे. नववीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या तेरा वर्षाच्या आदित्य पानटने पाण्याची माहिती देणारे अॅप तयार केले. त्याचे लांॅचिंग मंगळवारी मनपा अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात अाले.
नववीच्या वर्गात शिकणाऱ्या आदित्य पानट याला याची माहिती होती. त्यामुळे पाण्याची वेळ लवकर समजली तर नागरिक त्या वेळी घरी थांबतील किंवा व्यवस्था करून ठेवतील. त्यासाठी त्यावर उपाय म्हणून मोबाइलवर तसे अॅप तयार करण्याचा मानस केला. तो मानस त्याने वडील डॉ. आशिष पानट अाई डॉ. मानसी पानट यांना बोलून दाखवला. त्यांनीही त्याला प्रोत्साहन दिले. मनपात आयुक्त संगीता धायगुडे यांची भेट घेऊन माहिती दिली. त्यांनी त्यास सहकार्य करण्याचे आश्वासन देत पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनीही पाणीपुरवठ्याच्या वेळेची दिवसाची माहिती दिली. त्यानुसार आदित्य पानटने हे अॅप तयार करून ते गुगल प्ले स्टोअरवर अपलोड केले आहे. प्रभागातील नागरिकांना पाण्याच्या वेळेची माहिती मोबाइल अॅपवर मिळेल. त्यासाठी हे अॅप आहे. मात्र त्यावर नियमितपणे पाण्याची वेळ दिवसाची माहिती ही व्हॉल्व्हमनलाच अपलोड करावी लागणार आहे. त्यांच्यासाठी वेगळे अॅप तयार करून देण्यात आले आहे. त्याचेच लांॅचिंग झाल्याची घोषणा आयुक्त धायगुडे यांनी छोटेखानी कार्यक्रमात केली. या वेळी प्रभागातील नगरसेवक संजय गुजराथी उपस्थित होते.

१३ अंकाचा योगायोग
गुगलप्ले स्टोअरवर अॅप अपलोड करण्यासाठी किमान १३ वर्षे वयाची अट आहे. महापालिकेसाठी तयार केलेले अॅप गुगलीवर टाकताना आदित्यही आता १३ वर्षाचा झाल्याने ते अपलोड केले. त्यातच त्याचा जन्म दिनांक १३ ते अॅप ज्या प्रभागासाठी केले त्याचा क्रमांकही १३ आहे. असा १३ क्रमांकाचा योगायोग जुळून आला आहे. गुगल प्ले स्टोअरवर हे अॅप मोफत डाऊनलोड करता येणार आहे.

अभ्यासाचे इतरही अॅप तयार
आदित्य पानटला संगणकाची लहानपणापासूनच आवड आहे. वडील डॉ. आशिष पानट यांचे त्याला नेहमी प्रोत्साहन मिळाले आहे. नऊ, दहा वर्षांचा असताना अभ्यासाचे दोन ते तीन अॅप तयार केले. आईसाठी कामाचे अॅप करून दिले. संगणकाचा कोणताही क्लास लावता घरीच संगणकावर विविध पुस्तकांचे वाचन करून हे सर्व केले हे विशेष आहे.
बातम्या आणखी आहेत...