आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिरागड येथील डाेहात बुडून १३ वर्षीय बालकाचा मृत्यू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - शिरागड येथे सप्तशृंगीच्या दर्शनाला गेलेल्या बालाजीपेठेतील १३ वर्षीय नयन दीपक साेनार याचा गडाच्या पायथ्याशी असलेल्या नदीपात्रातील डाेहात बुडून मृत्यू झाला. तर त्याचा मित्र विजय ठाकूर हा बचावला आहे. गुरुवारी सकाळी १०.१५ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे बालाजीपेठेत शाेककळा पसरली आहे.

बालाजीपेठ कांचननगरातील १५ मुले बुधवारी सायंकाळी जळगाव येथून शिरागड येथील सप्तशृंगीच्या यात्राेत्सवाला पायी गेले हाेते. रात्री वाजता विदगावच्या पुढे पाेहचल्यानंतर त्यांनी एका शेतात मुक्काम केला. त्यानंतर गुरुवारी पहाटे वाजता उठून त्यांनी पुढचा प्रवास सुरू केला. सकाळी १० वाजता गडावर पाेहचल्यानंतर देवीचे दर्शन घेऊन सर्वजण गडाच्या पायथ्याशी असलेल्या नदीत उतरले. तापी नदीच्या पात्रात पाणी अधिक नव्हते. मात्र, थोड्याच अंतरावर नदीत एक मोठा डोह होता. या डोहात नयन साेनार आणि विजय ठाकूर हे दोघे मित्र पोहण्यासाठी निघाले. त्या वेळी काही दुकानदारांनी त्यांना पाण्यात जाऊ नका, पाणी खोल आहे, असे सांिगतले पण त्यांनी त्यांचे एेकले नाही. विजय आणि नयन पाण्यात उतरल्यानंतर नयनचा डोहातील गाळात पाय अडकल्यामुुळे त्याला बाहेर पडता आल्याने त्याचा मृत्यू झाला.

नयनच्या घरची हलाखीची परिस्थिती
नयनविद्यानिकेतन शाळेत आठवीला शिकत होता. त्याला एक लहान बहीण आहे. नयनचे आई-वडील एकमेकांपासून विभक्त झाले आहेत. बालाजीपेठेतील एका भाड्याच्या पडक्या खोलीत नयनची आई, बहिणी आजी एवढेच कुटुंब राहते. धुनीभांडीचे काम करून आई नयन त्याच्या बहिणीचे संगोपन करत होती. दरम्यान या घटनेनंतर आता त्याच्या आईचा सहारा गेला आहे.

टीनएजर्सचीधमाल; पालकांची दमछाक
शिरागडयेथे बुधवारी गेलेले सर्वच टीनएजर्स होते. यातील अनेकांना पालकांनी जाण्याचा सल्ला िदला होता. मात्र, पालकांचा राग, सूचना सर्व पायदळी तुडवत त्यांनी शिरागड जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यांचा पालकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यांनी जर पालकांचे एेकले असते तर अशी अप्रिय घटना घडली नसती.

विजयचे मित्राला वाचविण्याचे प्रयत्न
नयनडाेहात बुडत असताना विजयने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. या वेळी विजयचा सुद्धा तोल गेला होता. त्यामुळे दोघेही बुडू लागले. हे खेळणी विक्रीचे दुकान थाटलेल्या भिल्ल कुटुंबातील १२ वर्षीय मुलाने पाहिले. त्यामुळे त्याने तत्काळ पाण्यात उडी घेऊन काही सेकंदातच विजयला पाण्याबाहेर ओढले. मात्र, याच वेळेत नयन पूर्णपणे पाण्याखाली गेल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. विजयचे दैव बलवत्तर असल्यामुळे त्याने खराेखर मृत्यूवर ‘विजय’ मिळवला. घटनेच्या काही वेळानंतर परिसरातील पट्टीच्या पोहणा-यांनी नयनचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. नयनच्या मित्रांनी ही घटना फोनवरून त्यांच्या घरी कळवली. त्यानंतर बालाजीपेठेतील काही नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत १२ वाजता नयनचा मृतदेह सिव्हिलमध्ये आणला. याप्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.