आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीपोत्सवासाठी आले यंदा 133 कोटी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- शासकीय, निमशासकीय अणि खासगी क्षेत्रात काम करणार्‍या कर्मचार्‍यांना दिवाळीपूर्वीच पगार, सानुग्रह अनुदान, बोनस मिळाल्याने यंदाच्या दिवाळीत सुमारे 133 कोटी रुपये बाजारात येणार आहेत.

बोनस आणि पगाराची रक्कम दोन दिवस अगोदरच कर्मचार्‍यांच्या हाती पडली आहे. खासगी क्षेत्रात काम करणार्‍या कर्मचार्‍यांना यंदा पगार आणि बोनस अशी दुप्पट रक्कम हाती पडल्याने त्यांची दिवाळी जोरात साजरी होणार आहे. तर शासकीय कर्मचार्‍यांना पगारावरच दिवाळी साजरी करावी लागणार आहे. पगार आणि बोनस असे एकत्रित 133 कोटी रुपये बाजारात येणार आहेत.

रेल्वे कर्मचार्‍यांना 78 दिवसांचा बोनस
रेल्वेने दिवाळीचा बोनस म्हणून कर्मचार्‍यांना 78 दिवसांचा पगार दिला. तसेच ऑक्टोबर महिन्याचा पगारही त्यांच्या बॅँक खात्यात जमा झाले आहेत. 18000 कर्मचारी रेल्वेचे असल्याने सर्वात मोठी खरेदीत उलाढाल रेल्वे कर्मचार्‍यांच्या माध्यमातून बाजारात होणार आहे.

चतुर्थ कर्मचार्‍यांना सण, धान्य अग्रीम
शासकीय सेवेत काम करणारे वर्ग तीन व चारमधील कर्मचार्‍यांना सण अग्रीम म्हणून पाच हजार रुपये अदा करण्यात आले आहेत. तर वर्ग 4 मधील कर्मचार्‍यांना सण अग्रीमबरोबर धान्य अग्रीम म्हणून 10 हजार रुपये देण्यात आले. तर अन्य निमशासकीय संस्थांनी कर्मचार्‍यांना सानुग्रह अनुदान दिले आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर वेतन फरकाची रक्कम, वेतन भत्तेही मिळाल्याने अनेक शासकीय कर्मचार्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

स्टेट बँकेत चौपट उलाढाल
भारतीय स्टेट बॅँकेच्या मुख्य शाखेत गेल्या महिन्यात 4 कोटी 5 लाखांची उलाढाल झाली होती. तर चालू महिन्यातील शेवटच्या आठवड्यात तब्बल चौपट म्हणजे 12 कोटी रुपयांची उलाढाल झाली. इतर बॅँकांमध्येही पगारासोबत बोनसची रक्कम जमा झाल्याने मोठी उलाढाल झाली आहे.

दर महिन्यापेक्षा तिप्पट ट्रॉझेक्शन स्टेट बॅँकेतून होत आहे. शासकीय कर्मचारी आणि सेवानिवृत्तांची पेन्शन खात्यात 24 ऑक्टोबरपासूनच जमा व्हायला सुरुवात झाली आहे. र्शीकांत धोंड, सहायक महाव्यवस्थापक, स्टेट बॅँक

शिक्षक, सेवानिवृत्तांची पेन्शन आणि नियमित कर्मचार्‍यांचे दोन दिवसांपूर्वीच पगार झाले आहेत. वर्ग एक आणि दोनमधील अधिकार्‍यांचे पगार संबंधित हेडमधून होतील. राजू सोळुंखे, लेखा व वित्त अधिकारी