आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

14 युवतींनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन, या होत्या प्रमुख मागण्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - बहुजन मोर्चात सहभागी झालेल्या रूपाली सूर्यवंशी, निर्मिती सोनवणे, भाग्यश्री ठाकरे, जैनाबी पटेल, सुवर्णा भारूडे, गुंजन जयराज, दीपाली पेंढारकर, दीक्षा सपकाळे, सय्यद फिजा जहांगीर, ममता सपकाळे, सीमा सोनवणे, स्नेहा नरवाडे, भाग्यश्री बहारे, नेहा लोहार या युवतींनी जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांना निवेदन दिले. 
 
प्रमुख मागण्या 
अॅट्रॉसिटी कायदा कडक करण्यात यावा, खामगाव येथील आश्रमशाळेतील आदिवासी विद्यार्थिनीवर अत्याचार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी, सच्चर समितीच्या शिफारशीनुसार मुस्लिम समाजाला आरक्षण देण्यात यावे, जातप्रमाणपत्र पडताळणीतील जाचक अटी वगळाव्या, ओबीसी, भटक्या विमुक्तांना लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देण्यात यावे, ओबीसीमधील अल्पसंख्य जातींसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करावे, महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी कडक कायदे करण्यात यावे. 
 
माेर्चामागे स्वच्छता समिती : मोर्चेकऱ्यांनीपाणी पिल्यानंतर रस्त्यावरच पाऊच फेकले होते. ते माेर्चाच्या मागे येणाऱ्या स्वच्छता समितीच्या स्वयंसेवकांनी उचलून ते गाेण्यांमध्ये भरून रस्ता स्वच्छ केला. 
बातम्या आणखी आहेत...