आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागासवर्गीयांसाठी राबवण्यात येणाऱ्यामाेटार वाहन प्रशिक्षण याेजनेत 145 कोटी रुपयांचा घाेटाळा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव: मागासवर्गीयांसाठी राबवण्यात येणाऱ्या माेटार वाहन प्रशिक्षण याेजनेत जळगावच्या रमेश ड्रायव्हिंग स्कूलने १४५ कोटी रुपयांचा घाेटाळा केल्याचे उघड झाले आहे. या याेजनेंतर्गत प्रशिक्षणार्थींना निवासाचा भाेजनाचा तसेच विद्यावेतनाचा लाभ दिल्याचा ठपका महालेखापरीक्षकांच्या अहवालात ठेवण्यात अाला अाहे. यासंदर्भात मुंबईच्या एका दैनिकानेही वृत्त प्रसिद्ध केले आहे. तर याच पार्श्वभूमीवर नाथ फाउंडेशनने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली आहे. 
 
मागासवर्गीय विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करून आपली उपजीविका चालवता यावी, हा या याेजनेमागचा हेतू हाेता. परंतु, १४५ काेटी रुपये खर्च करून किती विद्यार्थ्यांना यातून नाेकरी मिळाली, याची ठाेस माहिती सामाजिक न्यायविभागाकडे प्राप्त नसल्याचे नाथ फाउंडेशनने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले अाहे. रमेश माेटार ड्रायव्हिंगचे मालक सुनील झंवर हे शालेय पाेषण अाहारातील भ्रष्टाचार झालेल्या साई मार्केटिंग कंपनीचे मालक असून त्यांनाच शासनाने शालेय पाेषण अाहाराचा कंत्राट दिला हाेता. त्यातही अनेक घाेटाळे समाेर अाले अाहेत. झंवर यांच्या पाठीशी असा काेणाचा वरदहस्त अाहे, ज्यामुळे शासन त्यांच्यावर कारवाई करण्यात हलगर्जीपणा करीत अाहे? असा सवाल नाथ फाउंडेशनने उपस्थित केला अाहे.
 
जिल्हाधिकाऱ्यांनी झंवर यांच्यावर तत्काळ कार्यवाही करून शालेय विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी फाउंडेशनचे अशाेक लाडवंजारी, नगरसेवक सुनील माळी, डाॅ. अभिशेक ठाकूर, विनाेद मराठे, जयेश ठाकूर, अनिल देशमुख, दीपक फालक, प्रकाश पंडित यांनी केली अाहे.
 
असे होते प्रशिक्षण 
शासनाने रमेश माेटार ड्रायव्हिंग स्कूल यांना सन २००८ ते २०१५ या कालावधीत विमुक्त जाती, भटक्या जमाती, मागासवर्गीयांसाठी १४५ काेटी रुपयांचे माेटार वाहन प्रशिक्षण याेजनेचे काम दिले हाेते. या याेजनेंतर्गत प्रशिक्षण घेणाऱ्यांना ४० दिवसांत प्रशिक्षण देणे अपेक्षित हाेते. तसेच प्रशिक्षण कार्यक्रमात प्रशिक्षणार्थींच्या निवासाची विद्या वेतनाची तरतूद केली हाेती. परंतु, अनेकांना प्रशिक्षण देण्यात अाले नसल्याचे दिसून अाले अाहे. या शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत लाभार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या असता ३४ पैकी २८ विद्यार्थ्यांना निवासाचा, भाेजनाचा विद्यावेतनाचा लाभ देण्यात अाला नाही, असे महालेखा परीक्षकांनी केलेल्या परीक्षण अहवालात नमूद केले अाहे. 
बातम्या आणखी आहेत...