आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • 15 June To Starts School Parents Are Economic Harassment

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

15 जूनपासून शाळा; पालकांच्या खिशाला लागणार कात्री

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव: महागाई दिवसेंदिवस वाढत असल्याने प्रत्येकाला महिन्याच्या बजेटची पडलेली आहे. 15 जूनपासून शाळा सुरू होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची शाळेची तयारी सुरू झालेली आहे. पहिलीच्या वर्गात अ‍ॅडमिशन घेणा-या विद्यार्थ्यांच्या पालकांना जून महिना सांभाळून खर्च करावा लागणार आहे.
जून महिन्यात पालकांच्या खिशाला कात्री लागणार असून महिन्याचा बजेट कोलमडणार आहे. शाळेच्या डोनेशनपासून ते ड्रेसपर्यंत सगळा खर्च जून महिन्यातच होणार असून महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच शाळेची सगळी तयारी करावी लागते. त्याचप्रमाणे मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांचा खर्च हा इंग्रजी व सीबीएससी, आयसीएससी शाळेतील विद्यार्थ्यांपेक्षा खूपच कमी आहे. आठवीपर्यंत शिक्षण मोफत केल्यामुळे इंग्रजी व सीबीएससी शाळांतील विद्यार्थ्यांना शाळांप्रमाणे पुस्तके असल्याने प्रत्येक सीबीएससी शाळांतील पुस्तके ही वेगवेगळी आहेत. मात्र, पालक शिक्षणाच्या बाबतीत जागृत झाले असून त्यासाठी लागणा-या आवश्यक त्या गरजा पूर्ण करत असतात.
डोनेशनचाही भार न चुकणारच
ज्या पालकांच्या पाल्यांना यंदा नवीन अ‍ॅडमिशन करायची आहे. त्यांना तर जूनचा पूर्ण पगार हा शाळांनी चालवलेल्या व्यवसायालाच द्यावा लागणार आहे. वह्या, पुस्तके, ड्रेस यांच्यासोबत प्रथम डोनेशनचा भार पालकांना सोसावा लागणार आहे. प्रत्येक शाळेचा डोनेशनचा वेगळा दर असल्याने खर्च आवरता आवरता नाकीनऊ येण्याची पाळी पालकांवर आली असून पहिलीत असलेल्या विद्यार्थ्यालाच 5 ते 7 हजार रुपये खर्च लागतो आहे.
असा होईल सगळा खर्च
मराठी शाळा : जिल्हा परिषद व नगरपालिकेच्या शाळांमध्ये साधारण सरकारचे दोन ते तीन पुस्तके असतात आणि इतर मुलांच्या विकासासाठी वेगळे विषय. तसेच आठवीपर्यंत मुलांना मोफत शाळेतून पुस्तके मिळतात. तसेच खासगी मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये पहिलीचा सेट 500 रुपयांपर्यंत येतो. व्यवसायाचा खर्च इतर असून यामध्ये वह्या, ड्रेसेसचा खर्च वाढलेला असतो. 3 ते 5 हजार डोनेशन व्यतिरीक्त वह्या, पुस्तकांची खरेदी असणार आहे. यासोबत पुस्तकांचे कव्हर, टॅग, रंग यांचाही समावेश असतो.
इंग्रजी माध्यम : प्रत्येक शाळांतील पुस्तकांचे वेगवेगळे दर आहेत. इंग्रजी माध्यमातील पहिलीची पुस्तकांची साधारण किंमत 1 हजाराच्या वर असून वह्यांची किंमत 300 रुपयांपर्यंत जाते. तर ड्रेस 500 ते 800 रुपयांपर्यंत येतो. यामध्ये 5 हजारांपर्यंत डोनेशन येते म्हणजे सगळा इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांचा कमीत कमी खर्च 6 हजार 800 रुपयांपर्यंत येऊ शकतो.
फक्त शाळेच्या साहित्याचा सेट 2 हजारांपर्यंत येतो तर या सगळ्या सेटमध्ये पुस्तकांचे कव्हर, टॅग, रंग, पेन्सिल इत्यादींचाही समावेश असतो. विवेकानंद शाळेचा सेट 1200 रुपये, ओरिआॅन इंग्लिश मीडियमचा 1299 चा सेट तर विद्या इंग्लिश मीडियमचा 962 रुपयांचा पुस्तक, वह्या, शालेय साहित्याचा सेट येतो.
सीबीएसई माध्यम : प्रत्येक शाळांच्या पुस्तकांची आणि वह्यांची किंमत वेगवेगळी आहे. साधारण 2 हजारांपर्यंत पहिलीच्या वर्गाच्या पुस्तकांची किंमत असून वह्या 500 ते 700 रुपयांपर्यंत येतात. तसेच काही शाळांमध्येच पुस्तक आणि वह्यांची विक्री होत आहे. या शाळांचे ड्रेस 1 हजार ते 12 शे रुपयापर्यंत येतात.
येथेही पॅकेज सिस्टीम : सगळीकडे पॅकेज सिस्टीम अस्तित्वात आली असल्याने आता पुस्तकांच्या बाबतीत पॅकेज सिस्टीम आली आहे. फक्त शाळेचे नाव सांगितल्यास त्याचे पूर्ण वह्या, पुस्तके, इतर साहित्यांचे पॅकेज मिळते. एकाच पॅकेजमध्ये सगळ्या गोष्टी उपलब्ध असल्याने त्या व्यतिरीक्त कोणतीच गोष्ट व वस्तू घ्यावी लागत नाही. एक पूर्ण गठ्ठाच वर्गाप्रमाणे तयार असतो.
गणवेश, पुस्तके झालीत डोईजड; विशिष्ट दुकानावरूनच खरेदीचा शाळांचा आग्रह
‘मिशन अ‍ॅडमिशन’च्या दुसºया पर्वाला सुरुवात झाली आहे. गेल्या महिनाभरात ‘डोनेशन’च्या राक्षसाने पालकांच्या उरात धडकी भरली होती. आता पाल्यांचे पाठ्यपुस्तक आणि गणवेश डोईजड झाले आहेत. मस्तवाल संस्थाचालक मात्र पालकांना ‘बजेट’ सोपवून उन्हाळ्याच्या सुट्या उपभोगण्यासाठी ‘आऊट ऑफ सिटी’ गेले आहेत. शहरातील सीबीएसई, इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या बाहेर गणवेश तसेच पाठ्यपुस्तकांच्या याद्या लावण्यात आल्या आहेत. या यादीत त्या-त्या शाळेतील शालेय साहित्य मिळणाºया संबंधित दुकानाचा पत्ता दिला आहे. काही शाळांनी पालकांना आधीच याद्या दिलेल्या आहेत. विशिष्ट दुकानांशी करार करून आपापल्या शाळांचे शालेय साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. या दुकानदाराकडून छपाईच्या किमतीतच वस्तूंची विक्री केली जात आहे. किमतींवर कोणाचाही अंकुश नसल्यामुळे पालकांना महागाईची झळ बसते आहे. शाळांनी आपापल्या शाळेचे पाठ्यपुस्तके स्वत: तयार केल्यामुळे इतर कोणत्याही ठिकाणी सीबीएसईची पुस्तके उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे पालकांसमोर कोणताही पर्याय उरलेला नाही. विशिष्ट दुकानातूनच खरेदी का करावी लागते? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी पालक प्रयत्नही करीत नसल्यामुळे या शाळांवर दबावच येत नाही. पर्यायी मनमानी करण्याची एकही संधी शाळा सोडत नाही. मागचे पाढे पन्नास याप्रमाणे यंदाही शिक्षणक्षेत्रातील महागाईच्या आगीत पालक अक्षरश: होरपळले जात आहेत.
पैसे खर्च करूनही अडचणी
गेल्या दोन-तीन दिवसांपूर्वीच सीबीएसई तसेच इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे साहित्य खरेदी करण्याचे तात्पुरत्या वेळेसाठी दुकाने सुरू झाली आहेत. खरेदीसाठी पालकांची झुंबड उडते आहे. एकाच वेळी संपूर्ण पैसे जमा करूनही काही विषयांची पुस्तके आठ दिवसांनंतर मिळणार असल्याचे कळते आणि पुन्हा सर्व काम सोडून पालकांना फेºया माराव्या लागतात. ही अडचण दरवर्षी उद्भवत असते.
पालकांवर प्रचंड दबाव
आपल्या पाल्यांच्या शिक्षणासाठी हजारो रुपये खर्च करणाºया पालकांना शाळा प्रशासनाच्या विरोधात बोलण्यास दबाव आहे. शाळा वाटेल त्या किमतीत शालेय साहित्यांची विक्री करेल. वाटेल ते धोरण राबवेल. मात्र पालकांनी त्या विरोधात बोलुच नये, कारण पाल्यांना त्रास होईल, अशी भीती त्यांना सतावत असते. त्यांच्या या मजबुरीचा फायदा घेत संस्था मस्तवाल झाल्या आहेत.
संपूर्ण वर्षभराची फी
वर्षभरातून किमान तीन ते चार महिने शाळांना सुट्या असतात. मात्र, काही शाळा विद्यार्थ्यांकडून संपूर्ण एका वर्षाची फी वसूल करीत असतात. फी वसुली दोन टप्प्यात होत असल्यामुळे अनेक पालकांचे यागंभीर बाबींकडे दुर्लक्ष होत असते.
पाटी-पेन्सिल हरवली
पूर्वी गृहपाठ करण्यासाठी पाटी- पेन्सिल हाती घेऊन चिमुरडे अभ्यासाचे धडे गिरवत होते. त्याजागी आता ‘अत्याधुनिक नोटबुक’ आले आहेत. गृहपाठ करण्यासाठी या नोटबुकचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. प्रत्येक विषयासाठी वेगवेगळ्या नोटबुक आहेत. त्यामध्ये गृहपाठ करून सादर करावा लागतो. नियमित वह्या व्यतिरीक्त गृहपाठासाठी या नोटबुक वापराव्या लागतात. तसेच सिनीअर केजीच्या विद्यार्थ्यांना प्रोजेक्ट देण्यात येतात. अनेकदा हे प्रोजेक्ट त्या निरागस चिमुरड्यांना कळतच नाही. मात्र, शाळांकडून सक्ती असल्यामुळे पालकांच्या मदतीने पूर्ण करावे लागतात.
सिनीअर केजीसाठीचा अंदाजित खर्च
> प्रवेशासाठी डोनेशन - 15 ते 20 हजार रुपये
> पाठ्यपुस्तक तसेच वह्या, शालेय साहित्य - 800 ते एक हजार रुपये
> गणवेश (तीन ते चार प्रकारचे, शूज, सॉक्स) - एक हजार रुपये
> शाळेत जाण्यासाठी ऑटोरिक्षा खर्च - 300 ते 500 रुपये (प्रति महिना)
> ट्युशन फी - 500 ते 900 रुपये (प्रति महिना)
>शाळेची फी - 600 ते 800 रुपये (प्रति महिना)
घरच्या घरी बनवून घ्या स्कूल बॅग अन् सॅक; 19 वर्षांपासून अल्पना, अर्पना तयार करताहेत बॅग बनविण्याचा व्यवसाय
प्रत्येक महिलेला काही ना काही करायची आवड असते. कुकिंग करणे, शिवणकाम, ब्युटी पार्लरचे कोर्सेस, विणकाम, जरदोसी वर्क, मेहंदी, रांगोळी, पेंटिंग याप्रकारचे अनेक कामे महिला व तरुणी करत असतात. मात्र, शहरातील अल्पना लिमये व अर्चना चौधरी या दोघी बहिणी मिळून गेल्या 19 वर्षांपासून पर्सेस व ट्रॅव्हलिंग बॅग बनवण्याचा व्यवसाय करताहेत. आपल्या छंदाला त्यांनी व्यावसायिक स्वरुप दिले असून मेहनत व विविध संकल्पनेची सांगड घालत एका दप्तरावरून ते लॅपटॉप बॅगपर्यंतचा प्रवास त्यांनी गाठला आहे. यामध्ये शशी जावळे त्यांना मदत करतात. खास करून पुरुषांचा असणाºया या व्यवसायात महिलांनी पाय रोवले. या कामासाठी महिला कारागीर मिळत नव्हते, कोणी तयारच व्हायचे नाही. मात्र, तरीदेखील अनेक प्रकारच्या अडचणींना तोंड देत या तिघांनी मिळून हा व्यवसाय पुढे आणला. नशिराबाद, आसोदासह पूर्ण जिल्हाभरातून त्यांना आॅर्डर येतात त्याप्रमाणे बॅग बनवून देण्याचे काम या तिघे करतात.
मुंबईला जाऊन घेतले दोघींनी ट्रेनिंग
एका प्रदर्शनात एक महिला स्वत: तयार केलेल्या पर्सेस विकत होती. या बहिणींनी लगेच उत्सुकतेपोटी त्यांना विचारले की तुम्ही कुठून शिकलात त्या मुंबई म्हणाल्या. आजच्या 19 वर्षांपूर्वी त्यांनीही मुंबई गाठले आणि डोंबिवलीमध्ये या पर्सेस शिकल्या. आवड असल्याने आणखी रस वाटू लागल्याने वेगवेगळे प्रयोग करण्यास सुरवात केली. शिकून आल्यानंतर प्रथम दप्तराची आॅर्डर त्यांना मिळाली; परंतु सिझन संपल्यानंतर काय करायचे हा प्रश्न उभा राहिल्यानंतर त्यांनी इतर प्रकारच्या बॅग शिकण्यास सुरवात केली.
बॅगचे प्रकार
विविध प्रकारच्या आणि साइजच्या पर्सेस, स्कूल सॅक, कॉलेज सॅक, दप्तरे, लॅपटॉप बॅग, ट्रॅव्हलिंग बॅग सध्या बनवून देतात. याचे दर पुढील प्रमाणे पर्सेस 100 ते 400 रुपये, लॅपटॉप बॅग 450 रुपये, स्कूल सॅक 200 ते 450 रुपये, दप्तर 200 ते 400 रुपये, ट्रॅव्हलिंग बॅग - 175 ते 450 रुपये.
निरीक्षणातून घेतले बॅग शिवण्याचे धडे
लोकांच्या बॅगचे डिझाइन, बाजारात टांगलेल्या बॅग, शाळेतील मुलांचे दप्तर पाहून त्या प्रकारच्या बॅग बनविण्याचा प्रयत्न त्या करायच्या. प्रथम त्यांनी या सगळ्या प्रकारच्या एक एक बॅग, पर्स आणल्या आणि त्या उसवून परत तीच बॅग तशाच प्रकारे शिवून पाहिली. असे करता करता सगळ्या प्रकारच्या बॅग्ज त्या शिवायला लागल्या. एक दप्तर शिवून घेतल्यानंतर खूप ऑर्डर यायला लागल्या आणि मग खºया अर्थाने त्यांच्या व्यवसायाला सुरवात झाली.
आठ दिवस अगोदरच घेतली जाते आर्डर
ग्राहकांच्या पसंतीनुसार त्या बॅग्ज तयार करतात. एका प्रकारची एकच बॅग असते. कारण आर्डर दिली तरच बॅग्ज बनते. साधारण आठ दिवस अगोदर ऑर्डर द्यावी लागते आणि मे व जून महिना मोठा सिजन असल्याने खास करून त्यांच्या शालेय दप्तरे, सॅक, ट्रॅव्हलिंग बॅग्जची मोठ्या प्रमाणात मागणी असते.