आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विरवाडे फाट्याजवळ पकडला १५ किलो गांजा, मध्य प्रदेशातून आणून चोपड्यात विक्रीची तयारी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - मध्यप्रदेशातून गांजा आणून चोपडा शहरात विक्रीच्या तयारीत असणाऱ्या दाेघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चाेपडा-यावल रस्त्यावरील विरवाडे फाट्याजवळ अटक केली. त्यांच्याकडून लाख २४ हजार रुपये किमतीचा साडेपंधरा किलाे गांजा हस्तगत केला अाहे. 

एलसीबीचे पाेलिस निरीक्षक राजेशसिंह चंदेल यांना मध्य प्रदेशातून चाेपडा येथे गांजा विक्रीसाठी काही जण येणार असल्याची माहिती मिळाली हाेती. त्यानंतर पोलिसांनी यावल रस्त्यावरील विरवाडे फाट्याजवळ सापळा रचला. सापळा लावल्यानंतर त्यांना विनाक्रमांकाच्या दुचाकीवर दाेन जण येताना दिसले. पाेलिसांनी हटकले असता त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पाेलिसांनी त्यांना अटक केली. अटक केलेल्या रवी कालुसिंग पाडवी (वय १९, रा. लाकड्या हनुमान ता. शिरपूर) मनोज लश्या डावर (वय १९, रा. हिदपा बलवाडी ता.वरला, मध्य प्रदेश) यांची झडती घेतली असता त्यांच्याकडून १५ किलाे ५०० ग्रॅम गांजा हस्तगत करण्यात अाला. 

पोलिसांच्या पथकात सहायक पाेलिस निरीक्षक प्रकाश वानखेडे, मनोहर देशमुख, दिलीप येवले, मुरलीधर आमोदकर, मिलिंद सोनवणे, योेगेश पाटील, मनोज पाटील, सुशील पाटील, विनयकुमार देसले, रामकृष्ण पाटील, रवींद्र गायकवाड यांचा समावेश होता. 

बाजारात किंमत सव्वा लाख रुपये 
पकडलेल्यागांजाची लाख २४ हजार रुपये किंमत असून या दाेघांना पुढील कारवाईसाठी चाेपडा पाेलिसांच्या ताब्यात देण्यात अाले अाहे. त्यांच्यावर चाेपडा पाेलिस ठाण्यात अंमली पदार्थ विराेधी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात अाले अाहेत.